मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : “गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाहीतर…”, अजित पवारांची पुण्यात मिश्कील टिप्पणी

Ajit Pawar : “गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाहीतर…”, अजित पवारांची पुण्यात मिश्कील टिप्पणी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 29, 2023 11:38 AM IST

Ajit Pawar on Gautami Patil : पुण्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे. तिच्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर तूफान फटकेबाजी देखील पवारांनी केली.

Ajit Pawar on Gautami Patil
Ajit Pawar on Gautami Patil

पुणे : राज्यात सध्या राजकरणाबरोबर चर्चा सुरू आहे ती नृत्यांगणा गौतमी पाटील हीची. तिच्या अनेक कार्यकामात तिच्या चाहत्यांनी धुडगूस घातला आहे. तर तिच्या मानधनावरून देखील इंदूरीकर महराजांनी टीका केली होती. दरम्यान, एका बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमीहीचा कार्यक्रम ठेवल्याने देखील चर्चा झाली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील एका जाहीर भाषणात गौतमी पाटील हीचा कार्यकम ठेवायचा का म्हणत मिश्किल टीका केली होती. त्यानंतर काल पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्ननाला उत्तर देत त्यांनी तूफान फटकेबाजी केली.

Indapur Crime : हुंड्याच्या वादातून युवकाला खाऊ घातले मलमूत्र; अघोरी कृत्यही केले, घृणास्पद घटनेने इंदापूर हादरले

राज्यात यात्रा, वाढदिवसनिमित्त नृत्यांगणा गौतमी पाटील हीच्या नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात मुळशी तालुक्यात देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, अजित पवार यांना शुक्रवारी या बाबत प्रश्न विचारला.

Pune Crime : पुणे हादरले ! भिकारी महिलेवर बलात्कार; चौघांविरुद्ध गुन्हा

या प्रश्नावर त्यांनी चांगलीच फटकेबाजी केली. त्यांनी थेट माध्यम प्रतिनिधीला जाब विचारत ‘तुला काय वाईट वाटलं. ती बैलासमोर नाचेल नाहीतर आणखी कोणासमोर नाचेल. तुला का त्रास होतोय,’ अशी टिप्पणी केली. या नंतर त्यांनी केलेल्या व्यक्तव्यावर त्यांनी विस्तृत माहिती देखील दिली.

अजित पवार म्हणाले, “अनेक गावांत यात्रा, जत्रा सुरू आहेत. तेव्हा काही ठिकाणी करमणुकीसाठी तमाशे बोलवले जातात. त्यामुळे सध्या गौतमीचं नाव गाजत असून, पाटलीबाईंना आणा, असे मी सुचवले होते. जर त्यांना सुपारी परवडत, असेल तर नक्की गौतमीचा कार्यक्रम ठेवावा. बैल काय गायीसमोर नाचू देत, तो तिचा अधिकार आहे. नृत्याचे सादरकीकर हाच गौतमीचा व्यवसाय आणि उपजिविकेच साधन आहे. कला आणि अभिनयाच्या माध्यमातून ती त्याच्याकडं पाहते. लहान मुलाचं बारसं आहे, त्याला अजून काहीच कळत नाही. तरी देखील बारशाच्या निमित्ताने बोलावलं, तर तिला नाचावच लागतं. बैलाचा वाढदिवस असो किंवा बैलपोळाच्या शर्यतीत बैलगाडा पहिला आला असेल, तिचे ते कामच आहे,” असेही पवार म्हणाले.

WhatsApp channel