मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bachchu Kadu: आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा; सरकारी अधिकाऱ्यावर हात उगारणे अंगलट

Bachchu Kadu: आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा; सरकारी अधिकाऱ्यावर हात उगारणे अंगलट

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 08, 2023 02:10 PM IST

Breaking News: शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Bachchu Kadu
Bachchu Kadu

Bachchu Kadu News: शासकीय कामात अडथळा आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हात उगरणे आमदार बच्चू कडूंना अंगलट आले आहे. नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, या वादातून बच्चू कडूंनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण आणि शिवीगाळ करण्याचा आरोप होता. यासंदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बच्चू कडू यांच्यावर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण करण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर नाशिक न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

नाशिक आयुक्तांवर हात उगारल्या प्रकरणी बच्चू कडू यांना दोन वेगवेगळ्या प्रकारणात ही दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, २०१७ मध्ये अंपगाच्या मागण्यांसाठी नाशिक महापालिकेत आंदोलन सुरु केले. त्यावेळी बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यापूर्वी २०१४ मध्ये बच्चू कडू यांना अचलपूरचे आमदार म्हणून निवडून आल्याच्या तक्रारीत दोषी ठरवले होते. याप्रकरणात बच्चू कडू यांनना दोन महिन्यांचा साधा कारावास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार न्यायालयाने हा निकाल दिला होता.

IPL_Entry_Point

विभाग