मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Andheri : सहानुभूती दाखवून भाजपनं अंधेरीत नोटाचा प्रचार केला; विजयानंतर ठाकरे गटाचा फडणवीसांवर आरोप

Andheri : सहानुभूती दाखवून भाजपनं अंधेरीत नोटाचा प्रचार केला; विजयानंतर ठाकरे गटाचा फडणवीसांवर आरोप

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 06, 2022 01:56 PM IST

Andheri East Bypoll Result 2022 : अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला आहे.

anil parab vs devendra fadnavis
anil parab vs devendra fadnavis (HT)

Andheri East Bypoll Result 2022 : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला आहे. त्यांना १६ व्या फेरीअखेरीस ५८ हजार मतं मिळाली असून जवळपास १२ हजार लोकांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळं आता याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते आण माजी मंत्री अनिल परब यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टिकास्त्र सोडलं आहे. अंधेरीत भाजपनं उमेदवार मागे घेतला परंतु नोटाचा प्रचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळं आता अंधेरीतील निकालानंतर ठाकरे गट विरुद्ध भाजप असा वाद पेटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अंधेरीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले की, भाजपनं त्यांचा उमेदवार मागे घेतल्यानंतर मी त्यांचे आभार मानले होते. परंतु त्यांनी ऋतुजा लटकेंप्रती सहानुभूती दाखवत अंधेरीत नोटाचा प्रचार केला. भाजपनं माघार घेऊन लटकेंना पाठिंबा देण्यात काहीही अडचण नव्हती. परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांनी नोटाचा प्रचार केल्याचा आरोप अनिल परबांनी केला आहे.

ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी अंधेरीत नोटाचा प्रचार केला त्यांची नावंही मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे दिली होती. परंतु त्यांनी या कार्यकर्त्यांना समज न दिल्यानंच नोटाला ११ हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. त्यामुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीतून माघार घेत ऋतुजा लटकेंना सहानुभूती दिली परंतु कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी नोटाचा प्रचार केल्याचा आरोप अनिल परबांनी केला.

दरम्यान अंधेरीत मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंनी आघाडी घेतली होती. ही आघाडी प्रत्येक फेरीत त्यांनी कायम राखली. सोळाव्या फेरीअखेरीस ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंना ५८ हजार मतं मिळाली असून जवळपास १२ हजार लोकांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे.

IPL_Entry_Point