मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Job Alert : पुण्यातील भारती विद्यापीठात नोकरीची संधी; पदवीधर असाल तर लगेच करा अप्लाय!

Pune Job Alert : पुण्यातील भारती विद्यापीठात नोकरीची संधी; पदवीधर असाल तर लगेच करा अप्लाय!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 21, 2023 06:15 PM IST

Bharati Vidyapeeth Bharti : तुम्ही पुण्यात नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे.

Bharati Vidyapeeth Katraj Pune Bharti 2023
Bharati Vidyapeeth Katraj Pune Bharti 2023 (HT)

Bharati Vidyapeeth Katraj Pune Bharti 2023 : गेल्या काही महिन्यांपासून शासनाच्या अनेक विभागांसह खाजगी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती निघत आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुण नोकरीसाठी अर्ज करत आहेत. परंतु आता पुण्यात नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता पुण्यातील भारती विद्यापीठात अनेक जागांवर पदभरती निघाली आहे. चांगला पगार आणि आवडीचं पुणे लोकेशन मिळणार असल्यामुळं तुम्ही या पदांसाठी तातडीनं अप्लाय करू शकता. पुण्यातील भारती विद्यापीठात वित्त अधिकारी, परिक्षा नियंत्रक आणि नियुक्ती अधिकारी या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. याबाबतची अधिसूचना भारती विद्यापीठाकडून जारी करण्यात आली आहे. त्यामुळं तुम्ही इच्छुक पात्र असाल तर लगेच अप्लाय करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यातील भारती विद्यापीठाच्या भरती बोर्डानं २०२३ या वर्षासाठी रिक्त जागा भरण्याची घोषणा केली असून त्यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज भरण्यासाठीची अंतिम मुदत ही २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत असणार आहे. त्यामुळं आता कोणत्या पदांसाठी काय पात्रता आवश्यक आहे, याविषयी जाणून घेऊयात. भारती विद्यापीठातील वित्त अधिकारी या पदासाठी उमेदवाराचं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झालेलं असणं आवश्यक असून उमेदवाराला किमान अनुभव असणं आवश्यक आहे. परिक्षा नियंत्रक या पदासाठी उमेदवाराची पदवी झालेली असणं गरजेचं असून त्याला या पदाचा किमान अनुभव असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नियुक्ती अधिकारी या पदासाठी उमेदवाराचं पदवीपर्यंतचं शिक्षण झालेलं असणं गरजेचं असून किमान अनुभव असणं गरजेचं असल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

उमेदवारानं वरील पदांसाठी अर्ज करताना स्वत:चा बायोडेटा, दहावी आणि बारावीसह पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, उमेदवाराचा फोटो, आधार कार्ड आणि जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) इत्यादी कागदपत्रं उमेदवारांकडे असणं आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी भारती विद्यापीठाच्या या http://www.bvuniversity.edu.in वेबसाईटला भेट द्या.

IPL_Entry_Point