मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BARC Scientist Suicide: धक्कादायक! भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या; घरात आढळला मृतदेह

BARC Scientist Suicide: धक्कादायक! भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या; घरात आढळला मृतदेह

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 30, 2023 11:05 AM IST

Mumbai Crime News: ट्रॉम्बे येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (BARC) ५० वर्षीय शास्त्रज्ञाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

BARC Scientist Suicide
BARC Scientist Suicide

मुंबई : मुंबईतल्या भाभा अणूसंशोधन केंद्रातील (Bhabha Atomic Research Centre) एका ५० वर्षीय जेष्ठ शास्त्रज्ञाने राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे घडली. या शास्त्रज्ञाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, त्यांच्या शेजारच्यांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ट्रेंडिंग न्यूज

Chandrayan 3 : हायड्रोजनसोबतच चंद्रावर सापडणार जीवनाचे सूत्र, रोव्हर प्रज्ञानने लावला मोठा शोध

मनीष सोमनाथ शर्मा असे आत्महत्या केलेल्या शास्त्रज्ञाचे नाव आहे. ते बार्कमध्ये वरिष्ठ (BARC Scientist Suicide) शास्त्रज्ञ होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष यांनी सोमवारी दुपारी ३ च्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब त्यांच्या पत्नीच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने मनीष शर्मा यांना बार्कच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

मनीष सोमनाथ शर्मा हे त्यांची पत्नी नीतू मनीष शर्मा यांच्या सोबत राहत होते. शर्मा यांनी राहत्या घरात नायलॉनच्या दोरीच्या साह्याने पंख्याला लटकून गळफास घेत त्यांचे जीवन संपवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटणस्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, त्यांची आत्महत्या आहे की घातपात या दृष्टीने देखील पोलिस तपास करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग