Chandrayan 3 : हायड्रोजनसोबतच चंद्रावर सापडणार जीवनाचे सूत्र, रोव्हर प्रज्ञानने लावला मोठा शोध
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Chandrayan 3 : हायड्रोजनसोबतच चंद्रावर सापडणार जीवनाचे सूत्र, रोव्हर प्रज्ञानने लावला मोठा शोध

Chandrayan 3 : हायड्रोजनसोबतच चंद्रावर सापडणार जीवनाचे सूत्र, रोव्हर प्रज्ञानने लावला मोठा शोध

Published Aug 30, 2023 10:22 AM IST

Chandrayan 3 : चांद्रयान ३ चे रोव्हर प्रज्ञानने मोठा शोध लावला आहे. चंद्रावर ऑक्सिजनचे अस्तित्व सापडले असून आता रोव्हर हायड्रोजनच्या शोध घेत आहे. असे झाल्यास चंद्रावरील जीवनसूत्राची माहिती मिळणार आहे.

Chandrayan 3
Chandrayan 3

Chandrayan 3 update : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला (ISRO) चांद्रयान-3 मोहिमेद्वारे मोठे यश मिळाले आहे. मोहिमेच्या सहाव्या दिवशी प्रज्ञान रोव्हरने एक खास शोध लावल्याने शास्त्रज्ञांनाही आनंद झाला. चंद्रावर ऑक्सिजन असल्याचे रोव्हरला सापडले असून या सोबतच दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या पृष्ठभागावरील सल्फर असल्याचे पुरावे प्रज्ञान रोव्हरने दिले आहेत. रोव्हरकडून आता हायड्रोजनचा शोध सुरू आहे. जर चंद्रावर हायड्रोजन सापडले तर चंद्रावर मानवीवस्ती तयार करता येणार आहे. कारण हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र होऊन पाणी तयार होते. हे जर शक्य झाले तर हे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल.

रोव्हरने दिली चंद्राच्या तापमानाची माहिती

यापूर्वी रोव्हर प्रज्ञानने विक्रम लँडरच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाची माहिती दिली होती. या माहितीने शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले. दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान १० ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल असे वैज्ञानिकांना वाटत होते. मात्र, रोव्हरकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील तापमान ७० अंश सेल्सिअस पर्यंत होते. जे अपेक्षेपेक्षा खूपच जास्त होते.

चांद्रयानचे शोध ठरलतील वरदान

चांद्रयान-3 जे संशोधन करत आहे ते केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी वरदान ठरू शकते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश आहे. असे मानले जाते की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सापडलेल्या गोष्टींबद्दल कोणताही देश या पूर्वी शोधू लावू शकला नाही. ऑक्सिजनच्या उपलब्धतेमुळे चंद्रावर पाणी असण्याची शक्यता वाढली आहे. जर चंद्रावर हायड्रोजन सापडला तर भविष्यात चंद्रावर मानवी वस्तीचे स्वप्नही साकार होऊ शकते.

ISRO ने देखील ट्विट केले की रोव्हरवरील पेलोड LIBS द्वारे इन-सीटू मोजमापांमध्ये सल्फर (S), अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम आणि मॅंगनीज आणि ऑक्सिजन सारख्या घटकांचे अस्तित्व दिसून आले. ऑर्बिटरद्वारे चंद्रावर या घटकांची उपस्थिती शोधणे शक्य नव्हते. चांद्रयान-3 चा मुख्य उद्देश दक्षिण ध्रुवावर बर्फ शोधणे हा असून बर्फासारखे काही सापडले तर चंद्रावर जीवनाचा मार्ग सुखकर होईल असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर