मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit pawar : “..तर बाकीचे आमदार माघारी जातील अन् सरकार कोसळेल” अजित पवारांचे विधान

Ajit pawar : “..तर बाकीचे आमदार माघारी जातील अन् सरकार कोसळेल” अजित पवारांचे विधान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 07, 2023 09:02 PM IST

Ajit pawar on government : मंत्रिमंडळ विस्तार केला,तर बाकीची आमदार माघारी जातील आणि सरकार पडेल ही भिती आहे. म्हणून विस्तार केला जात नाही, असा आरोप अजित पवारांनी केली आहे.

Ajit pawar on government
Ajit pawar on government

ोरगajitएकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर काही आठवडे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस दोघांनीच राज्याचा कामकाज केला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला गेला मात्र मंत्रिमंडळाचा आकार कमी ठेवला. आता मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. बंडखोरी करताना प्रत्येक आमदाराला मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मंत्रिमंडळ विस्तार केला, तर बाकीची आमदार माघारी जातील आणि सरकार पडेल ही भिती आहे. म्हणून विस्तार केला जात नाही. मात्र, यामुळे राज्याचे नुकसान होत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

अहमदनगरमधील पाथर्डी येथे एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी सरकारवर घणाघात केला. पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदारांचा निधी पहिल्या वर्षी तीन कोटी, दुसऱ्या वर्षी चार कोटी आणि मागील वर्षी पाच कोटी केला. भाजपाच्याही आमदाराला ५ कोटी, कर्जत-जामखेडचा आमदार आणि श्रीगोंद्याच्याही आमदाराला ५ कोटी रुपये मिळाले. जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी डीपीडीसीचे पैसे कमी न करता जास्तीचा निधी दिला. मात्र यांचं सरकार आल्यावर आमच्या काळातील कामांना स्थगिती दिली. तिथे माणसं राहत नाहीत का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. 

पवार म्हणाले की, हा कसला रडीचा डाव खेळता. पाच-पाच लाख लोकसंख्येचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदारांची कामं तुम्ही थांबवता हा कोणता न्याय आहे. सरकार बदलत असतात. ताम्रपट घेऊन जन्माला कोणी आलं नाही. आताचे बसलेले सुद्धा नाहीत. जनतेच्या मनात येईल तेव्हा जनता बदल करतेच, असा इशारा अजित पवारांनी सरकारला दिला आहे.

 

IPL_Entry_Point