मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bangladesh : ढाक्यात एका इमारतीमध्ये भीषण स्फोट, १६ लोकांचा जागीच मृत्यू तर १०० हून अधिक जखमी

Bangladesh : ढाक्यात एका इमारतीमध्ये भीषण स्फोट, १६ लोकांचा जागीच मृत्यू तर १०० हून अधिक जखमी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 07, 2023 08:16 PM IST

Bangladesh Blast : बांगलादेशचीराजधानी ढाकायेथीलएका इमारतीत भीषण स्फोट झाला असून यामध्ये १६ लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ढाक्यात एका इमारतीमध्ये भीषण स्फोट
ढाक्यात एका इमारतीमध्ये भीषण स्फोट

बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका इमारतीत भीषण स्फोट झाल्याचे वृत्त आहे. रिपोर्टनुसार या घटनेत १६ लोकांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ही स्फोट मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी झाला. अजूनपर्यंत स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नाही. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, घटनास्थळी अग्निशमक दलाच्या पाच गाड्या दाखल झाली आहेत. आज सायंकाळी चार वाजून ५० मिनिटांच्या सुमारास हा स्फोट झाला. जखमींवर ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 


पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अधिकांश जखमींवर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ज्या इमारतीमध्ये हा स्फोट झाला त्याच्या पहिला मजल्यावर सॅनिटरी  प्रॉडक्ट्सचे अनेक स्टोर आहेत. त्याच्या बाजुलाच BRAC बँकची शाखा आहे. स्फोटामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या बसचेही मोठे नुकसान झाले आहे. 

रक्ताने माखलेला शर्ट परिधान केलेल्या एका व्यक्तीने माध्यमांना सांगितले की, तो या स्फोटात जखमी झाला आहे. स्फोट झाल्यानंतर अनेक खिडक्या तुटल्या तसेच इमारतीची एक भिंतही कोसळली. अनेक लोक जमिनीवर पडले होते. जखमी आक्रोश करत होते. मी कसेतसे खिडकीतून उडी मारून जीव वाचवला. तीन दिवसापूर्वी चटगावजवळ ऑक्सीजन प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला होता. 

IPL_Entry_Point

विभाग