मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Accident : रस्ता ओलांडणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला ट्रकनं चिरडलं; मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील घटना

Mumbai Accident : रस्ता ओलांडणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला ट्रकनं चिरडलं; मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील घटना

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 27, 2024 08:35 PM IST

Mumbai Women Kills In Road Accident: मुंबईच्या गोरेगाव परिसरात भरधाव ट्रकने ३५ वर्षीय महिलेला चिरडले.

मुंबईच्या गोरेगाव परिसरात ३५ वर्षीय महिलेला ट्रकने चिरडल्याची घटना घडली.
मुंबईच्या गोरेगाव परिसरात ३५ वर्षीय महिलेला ट्रकने चिरडल्याची घटना घडली.

Mumbai Goregaon Accident: मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेला रस्ता ओलांडत असताना डंपर ट्रकने एका ३५ वर्षीय महिलेला चिरडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. बांगुर नगर पोलिसांनी चालकावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना अजय आंबेडकर असे पीडितेचे नाव असून ती गोरेगाव आणि मालाड परिसरात घरकाम करत होती.

ट्रेंडिंग न्यूज

तिची आई शारदा मोहिते (वय, ६०) हिने पोलिसांना सांगितले की, सकाळी ९.३० वाजता त्या आपल्या १२ वर्षांच्या मुलाला रोजप्रमाणे आईच्या घरी सोडून कामाला निघाल्या. मोहिते यांनी सांगितले की, काम आटोपून अर्चना सायंकाळी सहाच्या सुमारास मुलाला घेण्यासाठी घरी परतत असे.

Mumbai crime : तरूणीवर बलात्कार करून केस कापून केले विद्रुप; धर्म परिवर्तनाची सक्ती केल्याचा आरोप

गुरुवारी अर्चना कामाला निघाली पण सायंकाळी ७ वाजेपर्यंत परत न आल्याने मोहिते यांना काळजी वाटू लागली आणि त्यांनी मोबाइलवर फोन केला. मोहिते यांनी सांगितले की, अर्चनाचा फोन एका पोलिस कॉन्स्टेबलने रिसीव्ह केला आणि तिला अपघात झाल्याची माहिती दिली आणि तिला गोरेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोहोचल्यावर मोहिते यांना अर्चनाचा मृत्यू झाल्याचे समजले.

Karoli Ghat Bus Accident: इंदूरहून अकोल्याकडे येणारी खासगी बस दरीत कोसळली; २८ प्रवासी जखमी

अर्चना रस्ता ओलांडत असताना मालाडहून जोगेश्वरीच्या दिशेने जाणाऱ्या डंपरने तिला धडक दिल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी मोहिते यांना सांगितले. या धडकेमुळे अर्चना रस्त्यावर पडली आणि तिच्या खांद्याला आणि डोक्याला मार लागला. पादचाऱ्यांनी जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन केल्यानंतर डंपरचालकाला अडवले.

बेकायदेशीर गाडी चालवणाऱ्या चालक अमरसिंग घायवत (वय, ३९) याला पोलिसांनी अटक केली आहे. घायवत वेगात होता आणि त्याने अर्चनाला रस्ता ओलांडताना धडक दिली. घायवत याला अटक करण्यात आली असून तो मद्यधुंद अवस्थेत होता का? हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती बांगुर नगर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. अर्जना यांच्या पतीचा २०१७ मध्ये दीर्घ आजाराने निधन झाल्यानंतर मुलाची सर्व जबाबदारी तिच्यावर होती. पतीच्या निधनानंतर तिने घरकाम करण्यास सुरुवात केली.

IPL_Entry_Point

विभाग