मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: डबल चीनपासून सुटका मिळवण्यासाठी करा हे फेशियल एक्सरसाईज

Yoga Mantra: डबल चीनपासून सुटका मिळवण्यासाठी करा हे फेशियल एक्सरसाईज

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 06, 2023 08:12 AM IST

Yoga for Double Chin: डबल चीन तुमचा लुक खराब करू शकते. यासाठी काळजी करण्याची गरज नाही, तर तुम्ही घरी बसून चेहऱ्याचे काही व्यायाम किंवा योगा करू शकता.

फेशियल एक्सरसाईज
फेशियल एक्सरसाईज (unsplash)

Facial Exercise to Lose Double Chin Fat: शरीरात कुठेही जास्त चरबी जमा होणे चांगले नाही. हे फक्त तुमचा लूकच खराब करत नाही तर आरोग्यासाठीही चांगले नाही. डबल चीन किंवा मानेवर जमा झालेली चरबीमुळे देखील तुम्ही कमी वयात म्हातारे दिसू शकतात. याची अनेक कारणे असू शकतात, जसे की आनुवंशिकता किंवा वयानुसार त्वचा सैल होणे. तुम्हालाही तुमच्या डबल चीनपासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुमच्या डेली रुटीनमध्ये काही फेशियल एक्सरसाईजचा समावेश करा.

ट्रेंडिंग न्यूज

ट्राय करा फेशियल योगा

फेशियल योगा किंवा एक्सरसाईजने डबल चीनपासून सुटका मिळवता येते, याचा तसा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. जरी अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की ते करणे फायदेशीर आहे. या व्यायामाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे तुम्ही ते आरामात करून पाहू शकता.

- तुमची मान मागे वळवा आणि छताकडे पहा. आपला खालचा जबडा पुढे खेचा. तुम्हाला हनुवटीखाली ताण जाणवेल. तुमची मान वर करुन १० पर्यंत मोजा. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे करत राहू शकता.

- आपल्या ओठांनी ओ आणि ई म्हणण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या जॉ लाइनचा व्यायाम होतो.

- ओठांनी पाउट करा आणि वर पहा.

- मान डावी-उजवीकडे आणि वर-खाली फिरवा. हे दिवसातून जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा करा.

- जीभ शक्य तितकी बाहेर काढा. आता नाकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. १० सेकंद या स्थितीत रहा.

- या सर्वांशिवाय सकस आहार घ्या आणि एकूण वजन कमी करा, तर चेहऱ्यावरील चरबी आपोआप कमी होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग