मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: गर्भवती महिलांसाठी उपयुक्त आहेत हे योगासन, नियमित केल्याने मिळेल फायदा

Yoga Mantra: गर्भवती महिलांसाठी उपयुक्त आहेत हे योगासन, नियमित केल्याने मिळेल फायदा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 04, 2023 07:05 PM IST

प्रेग्नेंसीमध्ये महिलांनी आरोग्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. हलके व्यायाम करताना त्या काही योगा देखील करु शकता. हे काही योगासन त्यांच्यासाठी फायदेशीर आहेत.

गर्भवती महिलांसाठी योगासन
गर्भवती महिलांसाठी योगासन (unsplash)

Useful Yoga Poses For Pregnant Woman: प्रेग्नेंसीमध्ये स्त्रियांना मूड स्विंग, थकवा आणि आजारपणाचा सामना करावा लागतो. या सर्वांवर योगाच्या मदतीने सहज मात करता येते. योगा केवळ तुमचे मन शांत करत नाही, तर गरोदर महिलांसाठी याचे अनेक फायदे आहेत. योगासनांमुळे मन प्रसन्न राहण्यासोबतच ते डिलेव्हरीसाठी देखील महत्त्वाचे आहे. गरोदरपणात काही योगासन केल्याने नॉर्मल डिलेव्हरी होण्यास मदत होते. तसेच गर्भातील बाळासाठी देखील हे फायदेशीर ठरते. प्रत्येक गर्भवती महिलेने योगासने केवळ तज्ञांच्या देखरेखीखाली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावीत.

ट्रेंडिंग न्यूज

बटरफ्लाय पोझ

हे आसन केल्याने प्रजनन अवयव बळकट होतात, तसेच उलट्यांचा त्रासही दूर होतो. यासाठी पाय समोर पसरून बसा आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. आता गुडघे वाकवून दोन्ही पाय श्रोणीच्या दिशेने आणा. दोन्ही हातांनी पाय घट्ट पकडून ठेवा. टाच जननेंद्रियाच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि दोन्ही पाय फुलपाखराच्या पंखांप्रमाणे वर आणि खाली हलवा. हे करताना श्वास घ्या आणि सोडा.

माउंटन पोझ

माउंटन पोझ हिप्स, हॅमस्ट्रिंग आणि मांडीचे स्नायू ताणण्यास मदत करते. तसेच ते तणाव आणि पाठदुखीपासून मुक्त होण्यास मदत करते. या योगासनांमुळे गर्भधारणेदरम्यान पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते. चटईवर पाय क्रॉस करुन बसा. आपले हात वर करा आणि नमस्कार स्थितीत आपले तळवे जोडा. जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत पोझ धरा आणि नंतर आराम करा.

ट्विस्टेड पोझ

बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी ट्विस्टेड पोझ खूप फायदेशीर आहे आणि यामुळे पाठीच्या कोणत्याही प्रकारचा ताण किंवा कडकपणापासून आराम मिळतो. पाय समोर पसरवून सरळ बसा. नंतर श्वास घ्या आणि आपले हात खांद्याच्या पातळीवर उचला. कंबरेपासून तुमचे शरीर उजवीकडे, डोक्याकडे आणि हात एकाच बाजूला फिरवत असताना हळू हळू श्वास सोडा. शक्य तितके हात मागे फिरवा. श्वास घेताना सामान्य स्थितीत परत या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग