Destination For Summer Holiday: उन्हाळ्याच्या सुट्ट्या येणार आहेत. अशा परिस्थितीत बहुतेक लोक प्रवासाचे नियोजन करू लागतात. या काळात बहुतेक लोक कुटुंबासह सहलीचे नियोजन करतात. तुम्हीही कुठेतरी फिरायला जायची तयारी करत असाल तर तुम्ही भारतातील काही सुंदर आणि उत्तम ठिकाणे एक्सप्लोर करा. तुम्हाला भारतात उन्हाळ्यात कुठे भेट द्यायची असेल, तर आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये भेट देण्याची चांगली ठिकाणे सांगत आहोत.
मे-जून महिन्यात कडक उन्हामुळे सर्वांना त्रास होतो. या काळात बहुतेक लोकांना थंड ठिकाणी जायला आवडते. मनाली, शिमला, नैनिताल, औली, लडाख, काश्मीर, दार्जिलिंग, गंगटोक, उटी, गुलमर्ग, मसुरी या ठिकाणांचा समावेश तुम्ही तुमच्या प्रवासाच्या यादीत करू शकता.
मुंबई, पुण्यात राहणारे लोक मे-जूनमध्ये या ठिकाणी भेट देऊ शकतात. माथेरान, खंडाळा, लोणावळा, कामशेत, पालघर, माळशेज घाट, भंडारदरा, लवासा, पाचगणी, सापुतारा, महाबळेश्वर, तारकली या काही ठिकाणी फिरायला जाता येते. हे सर्व मुंबई आणि पुण्यापासून जवळ आहेत.
गोवा, ऋषिकेश, अलेप्पी, जयपूर, उदयपूर, दार्जिलिंग, पाँडेचेरी, कासोल, पुष्कर, नैनिताल, जैसलमेर, उटी, मॅक्लिओडगंज, गोकर्ण, लोणावळा, कोडाईकनाल, आग्रा, जयपूर ठिकाणे एक्सप्लोर करण्यासाठी उन्हाळ्यात जाता येतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या