Best restaurants in India: भारतीय खाद्य संस्कृती जागतिक स्तरावर पोहोचली आहे. जगाच्या अनेक भागात भारतीय पदार्थ प्रसिद्ध आहे. हे एवढंच नाही तर आता भारतीयांच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला. भारतातील ३ उल्लेखनीय रेस्टॉरंट्सने आशियातील ५० सर्वोत्तम रेस्टॉरंट्सच्या यादीत आपले स्थान बनवले आहे. मुंबईच्या आलिशान रेस्टॉरंट मास्कने या यादीत २३ वे स्थान मिळवले आहे. हे रेस्टॉरंट आता भारतातील सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीतही समाविष्ट झाले आहे. यानंतर दिल्लीतील इंडियन एक्सेंट २६व्या स्थानावर राहिला. गेल्या १० वर्षांपासून आशियातील ५० सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंटच्या यादीत आपले नाव कायम ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहे. चेन्नईच्या अवताराने ४४ व्या क्रमांकावर शानदार प्रवेश केला आहे आणि सर्वात प्रतिष्ठित न्यू एंट्री पुरस्कार देखील जिंकला आहे.
टोकियो, बँकॉक आणि थायलंडने आशियातील ५० सर्वोत्तम रेस्टॉरंटच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. सेझानने टोकियोमध्ये प्रथम स्थान पटकावले. बँकॉकमधील गग्गन आनंद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रेस्टॉरंटने थायलंडमधील सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंटचा किताब पटकावला.
शेफ वरुण तोतलानी यांच्या नेतृत्वाखाली मास्क रेस्टॉरंट १० कोर्स मेनूसह ग्राहकांच्या सेवेत आहे. येथील सर्वात स्वस्त डिश ४,५८३ रुपयांपासून सुरू होते. आयुर्वेद प्रेरित कॉकटेल देखील येथे इथे उपलब्ध आहेत. हे रेस्टॉरंट फ्यूजनसह क्लासिक भारतीय डिशेस सर्व्ह करते. आशियामध्ये २३ व्या स्थानावर आपले नाव बनवत, हे रेस्टॉरंट भारतातील सर्वोत्तम रेस्टॉरंटच्या यादीत सामील झाले आहे.
नवी दिल्लीच्या इंडियन एक्सेंट रेस्टॉरंटने आशियातील सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंटच्या यादीत २६ व्या स्थानावर आपले स्थान निर्माण केले आहे. हे प्रसिद्ध शेफ मनीष मेहरोत्रा चालवतात. हे रेस्टॉरंट २००९ मध्ये सुरु झाले होते. येथे सर्वात स्वस्त डिश तुम्हाला ४,१६७ रुपये मोजावे लागतील.
चेन्नईमध्ये अवतारना खूप लोकप्रिय होत आहे. आलिशान आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये स्थित हॉटेल अवतारानाने ४४ वे स्थान मिळविले आहे. येथे जेवणाची किंमत २,९१६ रुपयांपासून सुरू होते. १३ कोर्स रेंज शाकाहारी फूड येथे मिळते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या