मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Honeymoon Destination: हनिमूनला जाण्यासाठी बेस्ट आहेत हे रोमँटिक डेस्टिनेशन, कपल्सची आहे पहिली पसंती

Honeymoon Destination: हनिमूनला जाण्यासाठी बेस्ट आहेत हे रोमँटिक डेस्टिनेशन, कपल्सची आहे पहिली पसंती

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 28, 2024 11:13 PM IST

Romantic Destination: कपल्ससाठी हनीमून हे खूप खास आणि महत्त्वाचे असते. जर तुमच्या लग्नाची तारीख जवळ येत असेल आणि तुम्ही हनिमूनचा प्लान करत असाल, तर हनिमूनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन पहा.

हनिमूनसाठी रोमँटिक डेस्टिनेशन
हनिमूनसाठी रोमँटिक डेस्टिनेशन (unsplash)

Best Romantic Destination For Honeymoon: लग्नानंतर कपल्स हनिमूनला जाण्यासाठी उत्सुक असतात. यासाठी ते अशी लोकेशन शोधत असतात जी कपल्ससाठी बेस्ट आणि रोमँटिक असतील. हनिमून म्हणजे पती-पत्नी लग्नातील थकवा दूर करतात आणि रिलॅक्स करतात. यादरम्यान ते एकमेकांना जवळून ओळखतात. कपल्सच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण असतो. या काळात घालवलेले क्षण आयुष्यभर लक्षात राहतात. जर तुमच्या लग्नाची तारीख जवळ येत असेल आणि तुम्ही हनिमूनचे प्लॅनिंग करत असाल तर हनिमूनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स येथे पहा

गोवा

कपल्स हनिमूनसाठी गोव्यात जाऊ शकतात. हे भारतातील सर्वोत्तम हनिमून डेस्टिनेशन्सपैकी एक आहे. येथे नवीन कपल्स बीचवर एकमेकांचा हात धरून सुंदर दृश्यांचा आनंद घेतात. गोव्यात अनेक बीचेस आहेत, जिथे तुम्ही पार्टीचा आनंद घेऊ शकता. याशिवाय काही बीचवर तुम्ही एकमेकांसोबत शांतपणे वेळ घालवू शकता.

दार्जिलिंग

हे ठिकाण चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. येथे कपल हनिमूनसाठी सुद्धा जातात. येथे तुम्ही टॉय ट्रेनने प्रवास करू शकता. या काळात ट्रेनमध्ये बसून चहाचे मळे, देवदाराची जंगले आणि नद्यांचा संगम असे सुंदर नजारे पाहता येतात. या सीझनमध्ये तुम्ही इथे माउंट एव्हरेस्टचे शिखरही पाहता येऊ शकते.

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह

मॅरिड कपलसाठी हे बीच साईड डेस्टिनेशन स्वर्गापेक्षा कमी नाही. इथले सुंदर दृश्य तुम्ही याआधी क्वचितच पाहिले असेल. हॅवलॉक बेटाच्या एलिफंट बीचवर तुम्ही स्नॉर्कलिंगचा आनंदही घेऊ शकता. ज्या कपल्सना शांत जागा आवडतात त्यांच्यासाठी अंदमान आणि निकोबार बेटे सर्वोत्तम असेल.

तवांग

या सीझनमध्ये तुम्हाला तवांगचा वेगळा नजारा पाहायला मिळेल. तवांगचे माधुरी तलाव हे सर्वात प्रसिद्ध तलावांपैकी एक आहे. असे म्हणतात की जो कोणी हा तलाव पाहतो तो त्याकडे पाहत राहतो. या ठिकाणाचे सौंदर्य पाहण्यासाठी तुमच्या जोडीदारासोबत जा. कपल्ससाठी हे रोमँटिक डेस्किनेशन आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel