मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hot Air Balloon: भारतातील या ठिकाणी करू शकता हॉट एअर बलून राइड! एकदा नक्की भेट द्या

Hot Air Balloon: भारतातील या ठिकाणी करू शकता हॉट एअर बलून राइड! एकदा नक्की भेट द्या

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 20, 2024 08:10 PM IST

Travel Guide: भारतातील अनेक शहरांमध्ये हॉट एअर बलून राइड्स होतात. भारतातील या ठिकाणी तुम्ही या राइडचा आनंद घेऊ शकता.

भारतात हॉट एअर बलून राइडसाठी बेस्ट ठिकाण
भारतात हॉट एअर बलून राइडसाठी बेस्ट ठिकाण (unsplash)

Places in India for Hot Air Balloon Ride: ज्या लोकांना एडव्हेंचेरस अॅक्टिव्हिटी आवडतात त्यांना सर्व प्रकारच्या राइड्सचा आनंद घ्यायचा असतो. यापैकी एक अॅक्टिव्हिटी म्हणजे हॉट एअर बलून राईड. हॉट एअर बलून राईड ही विदेशी पर्यटकांसोबतच देशी पर्यटकांमध्ये सर्वात रोमांचक अॅक्टिव्हिटी आहे. भारतातील अनेक ठिकाणी या रोमांचक राइड्सचा आनंद लुटता येतो. भारतातील कोणत्या ठिकाणी तुम्ही हॉट एअर बलून राइडचा आनंद घेऊ शकता ते येथे जाणून घ्या. तुम्हाला काहीतरी साहसी करायचे असेल तर या ठिकाणी एकदा नक्कीच भेट द्या.

राजस्थान

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये हॉट एअर बलून राईड करता येते. या राइडचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे येतात. या राइड दरम्यान सुंदर दृश्ये पाहून तुम्हाला आनंद होईल. राइडला अंदाजे ६० मिनिटे लागतात. हे करण्यासाठी तुम्हाला अंदाजे ४ ते ५ हजार रुपये मोजावे लागतील.

महाराष्ट्र

महाराष्ट्रात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पण लोणावळा हे येथील लोकांचे आवडते वीकेंड डेस्टिनेशन आहे. लोणावळ्यात हॉट एअर बलून राईड करता येते. येथे बलून राईड सुमारे ६० मिनिटे चालते. आणि याची किंमत सुमारे ४-५ हजार रुपये असेल.

हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील मनाली येथे तुम्ही हॉट एअर बलून राइडचा आनंद घेऊ शकता. या राईडसाठी भारतात यापेक्षा चांगली जागा नाही. येथे देखील राइड सुमारे ६० मिनिटे आहे.

गोवा

जर तुम्हाला हॉट एअर बलून राईडचा आनंद घ्यायचा असेल तर गोवा हे उत्तम ठिकाण आहे. राइड दरम्यान तुम्हाला खोल समुद्राचे सुंदर दृश्य पहायला मिळेल. ऑक्टोबर ते मार्च महिन्यात तुम्ही येथे बलून राईड करू शकता.

दार्जिलिंग

हॉट एअर बलून राईडचा आनंद घ्यायचा असेल तर दार्जिलिंगपेक्षा चांगली जागा नाही. बौद्ध मठ, आकर्षक हिमालयीन शिखरे आणि चहाचे मळे पाहण्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग