IRCTC Package: काश्मीरला भेट देण्यासाठी आयआरसीटीसीने आणले आहे बेस्ट पॅकेज, जाणून घ्या डिटेल
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  IRCTC Package: काश्मीरला भेट देण्यासाठी आयआरसीटीसीने आणले आहे बेस्ट पॅकेज, जाणून घ्या डिटेल

IRCTC Package: काश्मीरला भेट देण्यासाठी आयआरसीटीसीने आणले आहे बेस्ट पॅकेज, जाणून घ्या डिटेल

Published Mar 27, 2024 11:28 PM IST

Travel Tips: काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. लाखो लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. तुम्हाला इथे फिरायला जायचे असेल तर आयआरसीटीसीने सर्वोत्तम पॅकेज आणले आहे.

आयआरसीटीसी कश्मीर पॅकेज
आयआरसीटीसी कश्मीर पॅकेज (unsplash)

IRCTC Kashmir Package: जम्मू-काश्मीर हे एक अतिशय सुंदर शहर आहे, ज्याला पाहण्यासाठी लोक फार लांबून लांबून येतात. या जागेला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात. पांढऱ्या पर्वतांनी वेढलेल्या या शहरात तुम्हाला खूप सुंदर नजारे पाहायला मिळतील. तुम्हीही या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर आयआरसीटीसी (IRCTC) एक उत्कृष्ट टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर ठिकाणी नेले जाईल. जर तुम्हाला या एयर टूर पॅकेजबद्दल जाणून घ्यायचे असेल तर येथे वाचा.

पॅकेजचे डिटेल्स

पॅकेजचे नाव - जन्नत-ए-कश्मीर एक्स लखनौ

डेस्टिनेशन कव्हर - गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर, सोनमर्ग

प्रवासाचे मोड - फ्लाइट

स्टेशन - लखनौ

कालावधी- 0६ रात्री आणि 0६ दिवस

टूरची तारीख- पहिले प्रस्थान- २९.०३.२०२४ ते ०३.०४.२०२४

दुसरे प्रस्थान- १४.०४.२०२४ ते १९.०४.२०२४

तिसरे प्रस्थान- १८.०४.२०२४ ते २३.०४.२०२४

चौथे प्रस्थान- २४.०४.२०२४ ते २९.०४.२०२४

जेवण योजना- एमएपीएआय (MAPAI)

पॅकेजमध्ये समाविष्ट आहे

- इंडिगो एअरलाइन्सद्वारे राउंड ट्रिप विमान भाडे. (लखनौ - श्रीनगर - लखनौ)

- नॉन एसी गाडीने एक्सप्लोरिंग

- श्रीनगर आणि पहलगाममध्ये राहण्यासाठी खोल्या

- हाऊस बोटमध्ये एक रात्र मुक्काम

- ०५ नाश्ता आणि ०५ जेवण

- प्रवास विमा

पॅकेजची किंमत

या पॅकेजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरवले जाईल. ज्याची किंमत वेगळी ठरवण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्हाला सिंगल शेअरिंगसाठी ५३७५० रुपये, ट्विन शेअरिंगसाठी ४८३०० रुपये आणि ट्रिपल शेअरिंगसाठी ३६९०० रुपये द्यावे लागतील. तर ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी बेडसह ३६९०० रुपये आणि बेडशिवाय ३३८०० रुपये शुल्क आहे. २ ते ४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी, बेडशिवाय किंमत २७५०० रुपये आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner