Useful Tips for Summer Trips: उन्हाळ्यात लोक घराबाहेर पडण्याआधी दोनदा विचार करतात. अशा परिस्थितीत प्रवासाचा विचार करणे सुद्धा अशक्य वाटते. पण अशी काही ठिकाणे आहेत जिथे लोक उन्हाळ्यात फिरायला जातात. मुलांना उन्हाळ्यात सुट्टी असते आणि अशा परिस्थितीत ते प्रवासासाठी उत्सुक असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटूंबासोबत फिरायला जायचे प्लॅन केले जातात. काही लोकांना उन्हाळ्यात फिरताना फारसा त्रास होत नाही तर काही लोकांसाठी हा काळ खूप कठीण असतो. उन्हाळ्याच फिरणे हे थोडे त्रासदायक असेल तरी पण या काळात प्रवास करणे ही वेगळी गोष्ट आहे. पण काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही उन्हाळ्यातील प्रवासाची मजा घेऊ शकता. जर तुम्ही या उन्हाळ्यात कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर काही ट्रॅव्हलिंग टिप्स फॉलो करा. या टिप्स तुमचा प्रवास सोपा करू शकतात.
- उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशन. तुम्ही कुठेही प्रवासाला जाल तर पाण्याची बॉटल सोबत ठेवावी. याशिवाय फळांच्या रसांचा आहारात समावेश करा. हे तुम्हाला हायड्रेटेड ठेवेल.
- उन्हाळ्याच्या काळात सूर्याच्या अतिनील किरणांच्या जास्त संपर्कामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुमच्यासोबत हाय एसपीएफ सनस्क्रीन ठेवा.
- उन्हाळ्यातील अॅक्टिव्हिटीमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपू शकते. अशा स्थितीत पोर्टेबल चार्जर सोबत असल्याची खात्री करा.
- दिवसभर ब्रेक घेणे महत्वाचे आहे, विशेषतः उन्हाळ्यात. विश्रांतीसाठी आणि फ्रेश होण्यासाठी थंड इनडोअर ठिकाणी थोडा वेळ घालवा.
- तुम्ही गरम ठिकाणी जात असाल तर सुती कपडे पॅक करा. सुती कपड्यांशिवाय हलके फॅब्रिकचे कपडेही या ऋतूत चांगले असतात.
- उन्हाळ्यात टोपी देखील पॅक करायला विसरू नका. याशिवाय सनग्लासेस ठेवा. हे तुमचे डोके आणि डोळे कडक उन्हापासून वाचवतील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या