Travel Tips: उन्हाळ्यात परीक्षा होऊन आता शाळा, कॉलेजला सुट्ट्या लागतात. अशावेळी हमखास फिरायला जायचा प्लॅन होतो. खूप गर्मी असल्याने कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जायचा प्लॅन केला जातो. जेव्हा लोक थंड ठिकाणी जायचे ठरवतात तेव्हा त्यांच्या मनात फक्त शिमला, मसुरी सारखी हिल स्टेशन्स येतात. या हिल स्टेशन्सवर एवढी गर्दी असते की तुम्ही शांततेचे काही क्षणही घालवू शकत नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एका हिल स्टेशनबद्दल सांगत आहोत जिथे तुम्हाला एप्रिल आणि मेच्या उन्हातही जॅकेट घालावे लागेल. एप्रिल आणि मेमध्ये तुम्हाला अजूनही इथे हिमवर्षाव पाहायला मिळतो. एकीकडे देशातील लोक उष्णतेने त्रस्त आहेत आणि दुसरीकडे तुम्ही बर्फवृष्टीचा आनंद घेत आहात यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे तुम्ही उन्हाळ्यातही बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता.
गंगटोकपासून ३ तासांचा प्रवास करून तुम्ही नथुलापास या ठिकाणी पोहचू शकता. इथे एका बाजूला वाहणारी नदी आणि दुसऱ्या बाजूला बर्फाच्छादित डोंगर बघायला मिळतो. नथुलापासला जाताना तुम्हाला भव्य टेकड्या दिसतील. जेव्हा तुम्ही चांगू तलाव ओलांडता तेव्हा तुम्हाला बर्फाने झाकलेले पांढरे टेकड्या दिसू लागतील. माथ्यावर पोहोचताच आजूबाजूला बर्फच दिसतो. तुमचे नशीब तुम्हाला साथ देत असेल, तर इथे बर्फही पडू शकतो. मे महिन्यातही नथुलापास बर्फवृष्टी होते. तुम्ही येथे बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता.
सुट्यांमध्ये छान काही शांततापूर्ण क्षण घालवायचे असतील, तर उत्तर पूर्वेतील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन सिक्कीमला भेट देण्याचा प्लॅन करा. सिक्कीम हे अतिशय सुंदर आणि कमी गर्दीचे ठिकाण आहे. इथल्या पर्यटन स्थळांवर तुम्हाला खूप कमी लोक दिसतील. अतिशय स्वच्छ आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले हे राज्य आपल्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. सिक्कीमची राजधानी गंगटोकमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. एप्रिल आणि मे महिन्यातही इथे थंडी असते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)
संबंधित बातम्या