मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mother's Day Recipe: आईसाठी झटपट बनवा रबडी केक, गोडव्यासोबत मिळेल थंडावा

Mother's Day Recipe: आईसाठी झटपट बनवा रबडी केक, गोडव्यासोबत मिळेल थंडावा

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 11, 2023 04:46 PM IST

Mother's Day Special: या मातृदिनाला आईसाठी केक बनवण्याचा विचार करत असाल तर नेहमीच्या केक ऐवजी ट्राय करा हा स्पेशल रबडी केक. याच्या गोडव्याने दिवस खास होण्यासोबतच हा उन्हाळ्यात थंडावा देखील देईल.

रबडी केक
रबडी केक

Rabdi Cake Recipe: रबडीचे नाव जरी घेतले तरी लगेच तोंडाला पाणी येते. रविवारी साजरा होणाऱ्या मदर्स डेला आईसाठी काहीतरी खास बनवण्याचा विचार करत असाल तर ही स्पेशल रेसिपी ट्राय करू शकता. सेलिब्रेशन म्हटले की केक आलेच. पण तुम्हाला नेहमीचे केक नको असेल तर बनवा रबडी केक. विशेष म्हणजे हा केक तुम्हाला उन्हाळ्यात थंडावा देखील देईल. चला तर पहा कसा बनवायचा टेस्टी रबडी केक.

ट्रेंडिंग न्यूज

Missi Roti बनवण्याची आहे ही नवीन पद्धत, लंच असो वा डिनर झटपट होईल तयार

रबडी केक बनवण्यासाठी साहित्य

स्पंज बनवण्यासाठी

- मैदा

- तेल

- बारीक केलेली साखर

- दूध

- बेकिंग पावडर

- बेकिंग सोडा

- व्हॅनिला इसेंस

रबडी बनवण्यासाठी

- दुध

- साखर

- वेलची पावडर

- केसर

- ड्रायफ्रूट्स

Summer Special: उन्हाळ्यात लिंबूपाणी नाही तर ट्राय करा मसाला कुकुंबर लेमोनेड, खास आहे शेफ कुणालची ही रेसिपी

रबडी केक बनवण्याची पद्धत

रबडी केक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊल मध्ये दुध, तेल आणि व्हॅनिला इसेंस घेऊन २ ते ३ मिनीट पर्यंत फेटून घ्या. आता मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, पिठी साखर चाळणीने गाळून घ्या. आता बाऊलमध्ये मिक्स करून नीट बॅटर तयार करून घ्या. हे बॅटर केक मोल्ड मध्ये ट्रान्सफर करा. लक्षात ठेवा, केक मोल्डला पहिले थोडे तूप किंवा तेल लावा, जेणेकरून बॅटर चिकटणार नाही. आता एक पॅन घ्या आणि त्यात एक ग्लास पाणी टाका. प्रथम १० मिनिटे मंद आचेवर पॅन गरम करा. नंतर केकचा साचा पॅनमध्ये ठेवा आणि मंद आचेवर ४० मिनिटे बेक करा. नंतर झाकण उघडा आणि टूथपिकने केक चेक करा. याशिवाय तुम्ही मायक्रोवेव्ह मध्येही बेक करू शकता.

Cold Coffee: घरच्या घरी बनवा कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी, चव वाढवण्यासाठी फॉलो करा ही ट्रिक

रबडीसाठी एका पॅनमध्ये १ लीटर दूध घ्या आणि ते अर्धे होईपर्यंत उकळा. केसरचे दूध, वेलची आणि साखर टाकून नीट मिक्स करा आणि काही मिनीटांसाठी झाकून ठेवा. आता स्पंज काढा आणि टूथपिकच्या मदतीने छिद्र करा. त्यावर रबडी मिश्रण टाका, बदाम, पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्याने गार्निश करा. थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. तुमचा स्वादिष्ट राबडी केक तयार आहे.

WhatsApp channel

विभाग