मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Special: उन्हाळ्यात लिंबूपाणी नाही तर ट्राय करा मसाला कुकुंबर लेमोनेड, खास आहे शेफ कुणालची ही रेसिपी

Summer Special: उन्हाळ्यात लिंबूपाणी नाही तर ट्राय करा मसाला कुकुंबर लेमोनेड, खास आहे शेफ कुणालची ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 10, 2023 05:11 PM IST

Chef Kunal Kapur Special Recipe: या उन्हाळ्यात नेहमीच्या लिंबू सरबत ऐवजी काही वेगळं ट्राय करायचं असेल तर बनवा मसाला कुकुंबर लमोनेड. खूप सोपी आहे शेफ कुणाल कपूर यांची ही रेसिपी.

मसाला कुकुंबर लेमोनेड
मसाला कुकुंबर लेमोनेड

Masala Cucumber Lemonade Recipe: उन्हाळा सुरू होताच लोक शरीराला थंड ठेवण्यासाठी अनेक प्रकारची ड्रिंक्स बनवतात आणि पितात. असेच एक प्रसिद्ध पेय म्हणजे लिंबू पाणी. उन्हाळ्यात बहुतेकांना लिंबू पाणी प्यायला आवडते. पण या उन्हाळ्याच्या हंगामात शेफ कुणाल कपूरची 'मसाला कुकुंबर लेमोनेड' ही अनोखी रेसिपी ट्राय करा. काकडीने बनवलेली ही रेसिपी केवळ चवीला अप्रतिम नाही तर उष्णतेपासून आराम मिळवण्यासही मदत करेल. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घेऊया 'मसाला कुकुंबर लेमोनड' कसे बनवायचे.

Cucumber Chutney: साउथ इंडियन स्टाईलमध्ये बनवा काकडीची चटणी, बोरिंग जेवणाची वाढेल चव

मसाला कुकुंबर लेमोनेड बनवण्यासाठी साहित्य

- १ काकडी

- मूठभर पुदिन्याची पाने

- २ १/२ टीस्पून बारीक केलेली साखर

- १ टीस्पून भाजलेले जिरे

- १/२ टीस्पून काळे मीठ

- चवीनुसार मीठ

- ३ चमचे लिंबाचा रस

- १ टीस्पून धणे पावडर

- १/२ कप थंड पाणी

- काही बर्फाचे तुकडे

- सोडा वॉटर

Cold Coffee: घरच्या घरी बनवा कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी, चव वाढवण्यासाठी फॉलो करा ही ट्रिक

मसाला कुकुंबर लेमोनेड बनवण्याची पद्धत

मसाला कुकुंबर लेमोनेड बनवण्यासाठी प्रथम काकडीसह सर्व साहित्य ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. आता हे मिश्रण गाळून घ्या. आता एका ग्लासमध्ये आइस क्यूब, मसाला काकडी आणि सोडा घालून मिक्स करा. तुमचे चविष्ट मसाला कुकुंबर लेमोनेड तयार आहे.

WhatsApp channel

विभाग