मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cucumber Chutney: साउथ इंडियन स्टाईलमध्ये बनवा काकडीची चटणी, बोरिंग जेवणाची वाढेल चव

Cucumber Chutney: साउथ इंडियन स्टाईलमध्ये बनवा काकडीची चटणी, बोरिंग जेवणाची वाढेल चव

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 10, 2023 11:19 AM IST

Summer Special Recipe: रोजच्या जेवणात वरण, भात आणि भाज्या खाण्याचा कंटाळा आला असेल तर त्यासोबत चटपटीत काकडीची चटणी बनवा. त्याची दक्षिण भारतीय टेस्ट जेवणाची चव वाढवण्यासाठी पुरेशी आहे.

साउथ इंडियन स्टाईल काकडीची चटणी
साउथ इंडियन स्टाईल काकडीची चटणी (freepik)

South Indian Style Cucumber Chutney Recipe: उन्हाळ्यात काकडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तुम्ही त्याचे कोशिंबीर आणि रायता बनवून अनेकदा खाल्ले असेल. आता काकडीची चटणी बनवा. दक्षिण भारतीय स्टाईलमध्ये तयार केलेली काकडीची चटणी रोजच्या वरण-भाताची चव वाढवते. यासोबतच हे खूप आरोग्यदायी आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा घरातील सदस्य जेवणासोबत चटणी खाण्याची मागणी करतील तेव्हा त्यांना काकडीपासून बनवलेल्या या अप्रतिम चटणी द्या. चिंचेचा आंबटपणाने तयार केलेली चटणी अप्रतिम लागते. चला तर मग जाणून घेऊया काय आहे काकडीची चटणी बनवण्याची रेसिपी.

- २ हिरव्या मिरच्या,

- १/२ चमचा जिरे

- १/२ चमचा मोहरी

- चिमूटभर हिंग

- २ लसूण पाकळ्या

- १/२ चमचा उडीद डाळ

- १/२ चमचा हरभरा डाळ

- २ ते ३ चमचे चिंचेचा कोळ

- मीठ चवीनुसार

- कोथिंबीर

- कढीपत्ता

- सुकी लाल मिरची

- २ चमचे तेल

Chef Style Recipe: दोडक्याची भाजी आवडत नाही? एकदा ट्राय करा चेफ रणवीर ब्रारची ही टेस्टी रेसिपी

काकडीची चटणी बनवण्याची पद्धत

- सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून सोलून घ्या. नंतर ती किसून घ्या.

- एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात हिरवी मिरची, उडीद डाळ आणि चणा डाळ घालून भाजून घ्या. गॅसवरून पॅन काढून ठेवा आणि थंड करा.

- आता हे तयार केलेला तडका मिक्सर जारमध्ये ठेवा. त्यात जिरे, मीठ आणि लसूण पाकळ्या एकत्र करून बारीक पेस्ट बनवा.

- या पेस्टमध्ये थोडी किसलेली काकडी आणि चिंचेचा कोळ घाला आणि चांगले मिक्स करा. आता ते बारीक करून घ्या.

- ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यात उरलेली किसलेली काकडी एकत्र करून नीट मिक्स करा. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला.

Mango Lassi: या उन्हाळ्यात साधी नव्हे तर ट्राय करा मँगो लस्सी, नोट करा ही पंजाबी रेसिपी

तडका द्या

काकडीच्या चटणीला तडका देण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे आणि मोहरी टाका. ते तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या टाका. आता त्यात चिमूटभर हिंग टाका आणि हा तयार तडका चटणीवर घाला. फक्त चांगले मिक्स करा आणि जेवणाबरोबर सर्व्ह करा.

WhatsApp channel