मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cold Coffee: घरच्या घरी बनवा कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी, चव वाढवण्यासाठी फॉलो करा ही ट्रिक

Cold Coffee: घरच्या घरी बनवा कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी, चव वाढवण्यासाठी फॉलो करा ही ट्रिक

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 09, 2023 05:55 PM IST

Cold Coffee Recipe: उन्हाळ्यात संध्याकाळी गरम चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी थंडगार कोल्ड कॉफी पिणे अनेकांना आवडते. घरच्या घरी कॅफे सारखी कोल्ड कॉफी बनवायची असेल तर ही ट्रिक फॉलो करा.

कोल्ड कॉफी
कोल्ड कॉफी

Cafe Style Cold Coffee Recipe: उन्हाळ्यात प्रत्येकाला काहीतरी थंडगार प्यायची इच्छा असते. संध्याकाळच्या वेळी लोक लस्सी, मँगोशेक, केळी शेक असे वेगवेगळे ड्रिंक्स बनवत असतात. तर कॉफीप्रेमी कोल्ड कॉफी आवडीने पितात. तुम्ही कॉफी प्रेमी नसले तरीही तुम्ही कोल्ड कॉफी ट्राय करू शकता. यासाठी तुम्हा कॅफेमध्ये जायची गरज नाही तर तुम्ही घरच्या घरी कॅफेसारखी कोल्ड कॉफी बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त एक ट्रिक फॉलो करावी लागेल. ही एक ट्रिक कॉफीची चव आणखी वाढवेल. चला तर जाणून घ्या ही खास रेसिपी.

Chef Style Recipe: दोडक्याची भाजी आवडत नाही? एकदा ट्राय करा चेफ रणवीर ब्रारची ही टेस्टी रेसिपी

कोल्ड कॉफी बनवण्यासाठी साहित्य

२ लोकांसाठी कोल्ड कॉफी बनवण्यासाठी..

- १ टीस्पून कॉफी पावडर

- दीड कप दूध

- २ टीस्पून गरम पाणी

- १ टीस्पून साखर

- ४ ते ५ बर्फाचे तुकडे

- चॉकलेट सिरप

Mango Lassi: या उन्हाळ्यात साधी नव्हे तर ट्राय करा मँगो लस्सी, नोट करा ही पंजाबी रेसिपी

कोल्ड कॉफी बनवण्याची पद्धत

दोन लोकांसाठी कोल्ड कॉफी बनवण्यासाठी सर्वप्रथम गरम पाण्यात कॉफी फेटून घ्या. आता हे ब्लेंडर जार मध्ये टाका. त्यात दूध टाका. साखर आणि बर्फाचे तुकडे सुद्धा टाका. आता ब्लेंडर मध्ये मिक्स करा. जोपर्यंत यात फोम येत नाही तोपर्यंत ब्लेंडर चालू ठेवा. आता एक ग्लास घ्या. त्यात आतून चॉकलेट सिरप टाका. सिरप टाकताना ते काचेच्या ग्लासच्या कडेवरून खाली टाका, म्हणजे ते समोरून दिसायला छान दिसेल. आता यात ब्लेंडर मधील कॉफी टाका. वरून कॉफी किंवा चॉकलेट पावडर स्प्रेड करून गार्निश करा. तुमच्याकडे व्हीप्ड क्रीम किंवा आईस्क्रीम असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. तुमची कूल कूल कोल्ड कॉफी रेडी आहे.

Protein Bar Recipe: दिवसभर एनर्जी लेव्हल हाय ठेवेल हा प्रोटीन बार, साखरेशिवाय बनवण्यासाठी पाहा ही रेसिपी

खास ट्रिक

जर तुम्ही कॉफीमध्ये साध्या पाण्याचे बर्फाचे तुकडे टाकले तर तुमच्या कोल्ड कॉफीचा रंग फिकट होईल. यासाठी तुम्ही अगोदरच साखर आणि कॉफी मिक्स करून आइसक्युब सेट करू शकता. असे केल्याने कॉफीची चव कमी होणार नाही आणि बर्फाचे तुकडे देखील आकर्षक दिसतील.

WhatsApp channel

विभाग