मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chef Style Recipe: दोडक्याची भाजी आवडत नाही? एकदा ट्राय करा चेफ रणवीर ब्रारची ही टेस्टी रेसिपी

Chef Style Recipe: दोडक्याची भाजी आवडत नाही? एकदा ट्राय करा चेफ रणवीर ब्रारची ही टेस्टी रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 09, 2023 10:58 AM IST

Chef Ranveer Brar's Recipe: घरी दोडक्याची भाजी केली की सगळे नाक मुरडतात, हे प्रत्येक घरातील चित्र असते. पण शेफ रणवीर ब्रारने सांगितलेल्या या रेसिपीपासून बनवलेली दोडक्याची भाजी खायला सर्वांनाच आवडेल. टेस्टी दोडक्याची भाजी कशी बनवायची ते जाणून घ्या.

दोडक्याची भाजी
दोडक्याची भाजी

Ridge Gourd Bhaji Recipe: घरी दुधी भोपळा, दोडका अशा भाज्या बनवल्या की मुलांसोबत मोठे सुद्धा खायचा कंटाळा करतात. प्रत्येकाला वाटते की ही एक आजारी लोकांची भाजी आहे. परंतु दोडका किंवा तुरई सुद्धा टेस्टी पद्धतीने बनवता येते. विशेषतः लोकांना दोडका अजिबातच आवडत नाही. शेफ रणवीर ब्रार यांनी याच दोडक्याची भाजी अतिशय चविष्ट पद्धतीने तयार केली आहे. तुम्ही सुद्धा ही ट्राय करू शकता. मुलांसोबत मोठ्यांनाही ही भाजी नक्कीच आवडेल.

- २ कांदे स्लाइसमध्ये कापलेले

- २ टोमॅटो चिरलेले

- ३ -४ लसूण पाकळ्या

- १ इंच आल्याचा तुकडा

- ३ हिरव्या मिरच्या

- कोथिंबीर बारीक चिरलेली

- २ ते ३ चमचे देशी तूप

- १ चमचा जिरे

- १/२ चमचा बडीशेप

- १/४ चमचा हिंग

- हळद

- लाल तिखट

- धने पावडर

- चवीनुसार मीठ

Protein Bar Recipe: दिवसभर एनर्जी लेव्हल हाय ठेवेल हा प्रोटीन बार, साखरेशिवाय बनवण्यासाठी पाहा ही रेसिपी

दोडक्याची भाजी बनवण्याची पद्धत

भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम दोडके चांगले धुवून सोलून घ्या. नंतर त्याचे चौकोनी तुकडे करा. त्यांना थोडे जाड कापून घ्या, जेणेकरून ते सहज शिजतात. आता कढईत देशी तूप टाकून गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे टाका. बडीशेप आणि हिंग एकत्र घाला आणि जिरे लाल झाल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण घाला. लसूण थोडा शिजला की हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून टाका. सोबत चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. कांदा ब्राऊन झाला की त्यात धनेपूड, हळद, लाल तिखट टाका. चांगले मिक्स करा. आता मसाल्यांसोबत चिरलेले दोडके घाला. मंद आचेवर शिजवा, म्हणजे दोडक्याचे पाणी सुकून ते शिजते. शिजायला लागल्यावर टोमॅटोचे तुकडे टाका. चवीनुसार मीठ घालून झाकून ठेवा. सुमारे ५ मिनिटांत टोमॅटो शिजतील आणि दोडके देखील शिजतील. 

Palak Momos: संडे बनवा सुपर टेस्टी हेल्दी पालक मोमोजने, पाहा शेफ कुणाल कपूरची ही रेसिपी

कोथिंबीरीने गार्निश करा आणि पोळीसोबत सर्व्ह करा. टेस्टी असण्यासोबतच ही रोजची भाजी पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. जे आजारी लोकांना तसेच मुलांना खायला घालणे आवश्यक आहे.

WhatsApp channel