मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mango Lassi: या उन्हाळ्यात साधी नव्हे तर ट्राय करा मँगो लस्सी, नोट करा ही पंजाबी रेसिपी

Mango Lassi: या उन्हाळ्यात साधी नव्हे तर ट्राय करा मँगो लस्सी, नोट करा ही पंजाबी रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 08, 2023 05:29 PM IST

Summer Special Drink: उन्हाळ्यात संध्याकाळी चहा, कॉफी घेण्याऐवजी काहीतरी थंड घेण्याची इच्छा असते. तुम्हाला सुद्धा काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तर बनवा मँगो लस्सी. खूप सोपी आहे ही रेसिपी.

मँगो लस्सी
मँगो लस्सी (Freepik)

Mango Mint Lassi Recipe: उन्हाळ्यात थंडावा मिळावा म्हणून लोक कधी ताक तर कधी लस्सी घेतात. अनेक लोक उन्हाळ्यात संध्याकाळी चहा घेणे टाळतात. त्यावेळी ताक किंवा लस्सी घ्यायला आवडते. लस्सी उन्हाळ्यात फक्त थंडावा देत नाही तर ते आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले दही पोट, त्वचा आणि केसांच्या आरोग्याची काळजी घेते. उन्हाळ्यात साध्या लस्सीऐवजी आंबा आणि पुदिन्याची लस्सी मिळाली तर चवीसोबतच त्याचे गुणही अनेक पटींनी वाढतात. चला तर मग जाणून घेऊया कशी बनवली जाते ही चविष्ट मँगो लस्सी.

- ४ टेबलस्पून साखर

- ३ चमचे पुदिन्याची ताजी पाने (बारीक चिरलेली)

- १ टीस्पून स्टार एनाइस पावडर

- १ टीस्पून छोटी वेलची पावडर

- १ टीस्पून लिंबाचा रस

- ४ कप साधे दूध किंवा दही

- गार्निशिंगसाठी पुदिन्याची काही पाने

Palak Momos: संडे बनवा सुपर टेस्टी हेल्दी पालक मोमोजने, पाहा शेफ कुणाल कपूरची ही रेसिपी

मँगो लस्सी बनवण्याची पद्धत

मँगो लस्सी बनवण्यासाठी सर्वप्रथम आंब्याचे साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्या. आता आंबा, पुदीना, दही आणि बाकीचे सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये टाकून ते मिक्सरमध्ये चांगले ब्लेंड करून घ्या. ब्लेंडर खोलून एकदा चेक करा की नीट ब्लेंड झाले आहे की नाही. नीट ब्लेंड झाल्यानंतर त्यात २ ते ३ बर्फाचे तुकडे टाकून परत ब्लेंड करा. तुमची मँगो लस्सी तयार आहे. ग्लास मध्ये काढून बरून पुदीन्याच्या पानांनी गार्निश करून थंड थंड सर्व्ह करा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता. गार्निश साठी सुद्धा ड्रायफ्रूट्स वापरू शकता.

WhatsApp channel

विभाग