मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Palak Momos: संडे बनवा सुपर टेस्टी हेल्दी पालक मोमोजने, पाहा शेफ कुणाल कपूरची ही रेसिपी

Palak Momos: संडे बनवा सुपर टेस्टी हेल्दी पालक मोमोजने, पाहा शेफ कुणाल कपूरची ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 07, 2023 08:10 PM IST

Momos Recipe: सुट्टीच्या दिवशी काही विशेष खायचे असेल तर ही मोमोजची रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट आहे. हे मोमोज बनवण्यासाठी मैद्याऐवजी पालकाची पाने वापरली जातात. ज्यामुळे ही रेसिपी अधिक आरोग्यदायी बनते. चला तर मग जाणून घेऊया ते कसे बनवले जातात.

पालक मोमोज
पालक मोमोज

Palak Patta Momos Recipe: जर मोमोजचे नाव ऐकून तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल, पण तुम्ही ते बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मैद्यामुळे ते खाणे टाळत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. शेफ कुणाल कपूरने त्यांच्या इंस्टाग्रामवर पालक पत्ता मोमोजची चवदार आणि आरोग्यदायी रेसिपी शेअर केली आहे. मोमोजची ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण आरोग्यदायीही आहे. ते बनवण्यासाठी मैद्याऐवजी पालकाची पाने वापरली जातात. ज्यामुळे ही रेसिपी अधिक आरोग्यदायी बनते. चला तर वाट कसली पाहताय जाणून घेऊया पालकाच्या पानांचे मोमोज कसे बनवायचे.

ट्रेंडिंग न्यूज

Chicken Kabab: सुट्टीचा दिवस होईल स्पेशल चिकन मलाई कबाबसोबत, खूप सोपी आहे रेसिपी

पालक पत्ता मोमोज बनवण्यासाठी साहित्य

फिलिंगसाठी

- ३ टेबलस्पून तेल

- १ टेबलस्पून लसूण

- १ टेबलस्पून आले

- २ कप चिरलेला कांदा

- दीड कप गाजर बारीक चिरलेला

- दीड कप कोबी

- १/२ कप बारीक चिरलेला मशरूम

- १ हिरवी मिरची

- १/२ कप पनीर

- १/२ कप बीन्स

- चवीनुसार मीठ

- १/२ टीस्पून काळी मिरी

- १/२ कप हिरवा कांदा

- १ चमचा कॉर्न स्टार्च

- १ टेबलस्पून बटर

- १ लिटर पाणी

- १ लिटर थंड पाणी

- थोडे तेल

चिली सोया डिप बनवण्यासाठी

- १/४ कप ठेचलेल्या मिरच्या

- दीड टीस्पून लसूण

- १/२ कप स्प्रिंग ओनियन्स

- १/४ कप कोथिंबीर

- चवीनुसार मीठ

- १ टेस्पून व्हिनेगर

- १/४ कप तेल

- ४ चमचे सोया सॉस

- थोडे पाणी

Kababs Recipe: स्नॅक्समध्ये बनवा प्रोटीनयुक्त सोयाबीन कबाब, नोट करा ही हेल्दी रेसिपी

पालक पत्ता मोमोज बनवण्याची पद्धत

पालकाच्या पानांचे मोमोजसाठी फिलिंग बनवण्यासाठी प्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात आले-लसूण घालून थोडा वेळ परतून घ्या. नंतर त्यात सर्व भाज्या घालून परतावे. यानंतर पॅनमध्ये सोया सॉस, व्हिनेगर आणि हिरवे कांदे घालून मिक्स करा. यानंतर कॉर्न स्टार्च आणि पाण्याचे पातळ द्रावण तयार करा आणि ते या फिलिंगमध्ये मिक्स करा. चवीसाठी तुम्ही त्यात थोडे बटरही घालू शकता. आता दुसर्‍या पॅनमध्ये पाणी उकळा आणि त्यात पालकाची पाने ५ सेकंद सोडा. यानंतर पाने काढून थंड पाण्यात टाका. आता एका चमच्याला तेलाने ग्रीस करून त्यात पालकाची पाने ठेवून त्यात फिलिंग भरा. आता ही पाने घडी करून बाजूला ठेवा. सर्व मोमोज तयार झाल्यानंतर वाफवायला स्टीमरमध्ये ठेवा.

डिप सॉस तयार करण्यासाठी डिप सॉसचे सर्व साहित्य एका भांड्यात ठेवा. ते चांगले मिक्स करा आणि १० मिनिटे राहू द्या. तुमचे चविष्ट पालक पत्ता मोमोज तयार आहेत. तुम्ही त्यांना सर्व्हिंग प्लेटमध्ये डिपिंग सॉससह सजवून सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग