मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chicken Kabab: सुट्टीचा दिवस होईल स्पेशल चिकन मलाई कबाबसोबत, खूप सोपी आहे रेसिपी

Chicken Kabab: सुट्टीचा दिवस होईल स्पेशल चिकन मलाई कबाबसोबत, खूप सोपी आहे रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 07, 2023 12:29 PM IST

Sunday Special Recipe: नॉनव्हेज लव्हर्सला कबाब खायला आवडतात. या नवीन ट्विस्टसह तुम्ही घरी चिकन कबाब ट्राय करू शकता. हे नेहमीच्या कबाबपेक्षा पूर्णपणे वेगळी चव देईल. ही आहे रेसिपी.

चिकन मलाई कबाब
चिकन मलाई कबाब

Chicken Malai Kabab Recipe: नॉनव्हेज शौकीन चिकन खाण्याची एकही संधी सोडू इच्छित नाही. पण रोजच्या गडबडीत काही खास बनवता येत नसेल तर रविवारच्या सुट्टीच्या दिवशी चिकन मलाई कबाब ट्राय करा. हे बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते. ते बनवण्यासाठी थोडी तयारी करून ठेवा, जेणेकरून ते लवकर बनवता येईल. चला तर मग जाणून घेऊया काय आहे चिकन मलाई कबाबची रेसिपी.

Kulfi Recipe: उन्हाळ्यात घ्या थंड-थंड होममेड कुल्फीची मजा, बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी

चिकन मलाई कबाब बनवण्यासाठी साहित्य

- १/२ किलो बोनलेस चिकन चौकोनी तुकडे

- १ टीस्पून कॉर्न स्टार्च

- १/२ कप दही

- १/३ कप हेवी फ्रेश क्रीम

- २ टीस्पून क्रीम चीज

- १/२ टीस्पून कांदा पावडर

- २ चमचे लसूण, आले, कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट

- १/२ टीस्पून धने पावडर

- १ टीस्पून जिरेपूड

- १/२ टीस्पून गरम मसाला

- १/२ टीस्पून काळी मिरी

- १ टीस्पून लिंबाचा रस

- मीठ चवीनुसार

Kababs Recipe: स्नॅक्समध्ये बनवा प्रोटीनयुक्त सोयाबीन कबाब, नोट करा ही हेल्दी रेसिपी

चिकन मलाई कबाब बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम बोनलेस चिकन धुवून त्याचे चौकोनी तुकडे करा. आता एका भांड्यात धने पूड, जिरे पूड, लसूण कोथिंबीर हिरवी मिरचीची चटणी मिक्स करा. सोबत गरम मसाला, कॉर्न स्टार्च, काळी मिरी घाला. फ्रेश क्रीम आणि क्रीम चीज घालून मिक्स करा. आता त्यात दही, मीठ घालून मिक्स करा. आता यात चिकनचे तुकडे टाकून चांगले कोट करा. मॅरीनेट करण्यासाठी साधारण अर्धा तास झाकून ठेवा. 

Jeera Biscuit: घरच्या घरी बनवा शुगर फ्री जीरा बिस्किट, चहा-कॉफीची वाढेल मजा

कढईत तेल टाका आणि गरम होऊ द्या. आता यात कढईत मॅरीनेट केलेले चिकन क्यूब्स एक एक करून ठेवा आणि मंद आचेवर शिजू द्या. चविष्ट चिकन मलाई कबाब तयार आहे. हिरवी पुदिन्याची चटणी आणि कांद्याच्या रिंग्ससोबत सर्व्ह करा.

WhatsApp channel