मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Protein Bar Recipe: दिवसभर एनर्जी लेव्हल हाय ठेवेल हा प्रोटीन बार, साखरेशिवाय बनवण्यासाठी पाहा ही रेसिपी

Protein Bar Recipe: दिवसभर एनर्जी लेव्हल हाय ठेवेल हा प्रोटीन बार, साखरेशिवाय बनवण्यासाठी पाहा ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 08, 2023 11:35 AM IST

Sugar Free Recipe : जर मुलांची दिवसभर एनर्जी टिकवायची असेल तर त्यांना हेल्दी गोष्टी खायला द्या. शुगर फ्री प्रोटीन बार केवळ ऊर्जाच देत नाही तर पौष्टिक घटकांमुळे त्यांच्या वाढीस देखील मदत करते.

प्रोटीन बार
प्रोटीन बार (Freepik)

Sugar Free Protein Bar Recipe: वाढत्या वयातील मुलांच्या चांगल्या ग्रोथसाठी त्यांचा आहार सुद्धा तेवढाच चांगला असणे महत्त्वाचे आहे. पण मुलं दिवसभर काही ना काही करत असतात आणि जेव्हा खायची वेळ येते तेव्हा त्यांना फक्त काहीतरी चवदार हवे असते. अशा मुलांना आवश्यक पोषण देणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून त्यांची वाढ चांगलीच नाही तर खेळण्यासाठी दिवसभर ऊर्जा सुद्धा टिकेल. उर्जेसाठी प्रोटीन बार हा उत्तम स्नॅक्स आहे. पण बाजारातून विकत घेण्याऐवजी तुम्ही ते साखरेशिवाय घरीच बनवू शकता. हे प्रोटीन बार फक्त लहान मुलेच नाही तर मोठे व्यक्तीसुद्धा खाऊन एनर्जी लेव्हल वाढवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया शुगर फ्री एनर्जी बार कसा बनवायचा.

ट्रेंडिंग न्यूज

- १/२ कप बदाम

- १/२ कप पिस्ता

- १/२ कप शेंगदाणे

- १/२ कप काजू

- १/२ कप क्रॅनबेरी

- मूठभर काळे मनुके

- २ चमचे फ्लेक्स सीड्स

- २ चमचे खरबूज आणि सूर्यफूल बिया

- १ कप पीनट बटर

- १/२ कप मध

- १ चमचा दालचिनी पावडर

- १/४ कप ओट्स

Chicken Kabab: सुट्टीचा दिवस होईल स्पेशल चिकन मलाई कबाबसोबत, खूप सोपी आहे रेसिपी

प्रोटीन बार बनवण्याची पद्धत

प्रथम सर्व ड्राय फ्रूट्स भाजण्यासाठी तयार करा. एका पॅनमध्ये बदाम आणि अक्रोड कोरडे भाजून घ्या. शेंगदाणे वेगळे भाजून घ्या. त्याचप्रमाणे काजू आणि पिस्ता स्वतंत्रपणे कोरडे भाजून घ्या. हलके सोनेरी भाजल्यानंतर ते सर्व एका भांड्यात काढून घ्या. ते थोडेसे थंड आणि कुरकुरीत झाले की मिक्सरच्या भांड्यात थोडे जाडसर बारीक करा. आता पीनट बटर वितळवा. एका बाउलमध्ये सर्व जाडसर बारीक केले ड्राय फ्रूट्स काढा आणि त्यावर वितळलेले पीनट बटर घाला. तसेच मध, दालचिनी पावडर आणि थोडे व्हॅनिला इसेन्स घाला. हे सर्व चांगले मिक्स करा. आता एका प्लेटवर किंवा सपाट पृष्ठभागावर बटर पेपर पसरवा आणि सर्व मिश्रण त्यावर पसरवा. चमचा किंवा वाटीच्या साहाय्याने चांगले दाबून चौकोनी आकार द्या आणि सेट होण्यासाठी साधारण दोन तास फ्रीजरमध्ये ठेवा.

Kulfi Recipe: उन्हाळ्यात घ्या थंड-थंड होममेड कुल्फीची मजा, बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी

दोन तासानंतर फ्रीजरमधून काढा आणि इच्छित शेप आणि साइजमध्ये कापून घ्या आणि बटर पेपरमध्ये गुंडाळा. तुमचे होममेड शुगर फ्री प्रोटीन बार तयार आहे. मुलांसोबतच मोठे सुद्धा हे आरामात खाऊ शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग