Tomato Bhaji: दुपारच्या जेवणात काही चटपटीत बनवायचे असेल तर ट्राय करा टोमॅटो शेवची भाजी, सर्वांना आवडेल रेसिपी-how to make tomato sev bhaji or sabji recipe for lunch ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tomato Bhaji: दुपारच्या जेवणात काही चटपटीत बनवायचे असेल तर ट्राय करा टोमॅटो शेवची भाजी, सर्वांना आवडेल रेसिपी

Tomato Bhaji: दुपारच्या जेवणात काही चटपटीत बनवायचे असेल तर ट्राय करा टोमॅटो शेवची भाजी, सर्वांना आवडेल रेसिपी

Apr 25, 2024 11:38 AM IST

Lunch Recipe: जर तुम्हाला रोज लंचमध्ये त्याच भाज्या, डाळ खाण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी चटपटीत टोमॅटो आणि शेवची भाजी बनवा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल ही भाजी. जाणून घ्या रेसिपी.

Tomato Bhaji: दुपारच्या जेवणात काही चटपटीत बनवायचे असेल तर ट्राय करा टोमॅटो शेवची भाजी, सर्वांना आवडेल रेसिपी
Tomato Bhaji: दुपारच्या जेवणात काही चटपटीत बनवायचे असेल तर ट्राय करा टोमॅटो शेवची भाजी, सर्वांना आवडेल रेसिपी (freepik)

Tomato Sev Bhaji or Sabji Recipe: रोज त्याच त्या भाज्या, कडधान्ये आणि डाळी बनवून आणि खाऊन कंटाळा येतो. दुपारच्या जेवणात काहीतरी वेगळं चटपटीत ट्राय करायचा विचार असेल तर तुम्ही टोमॅटो आणि शेवची ही मसालेदार भाजी बनवू शकता. ही भाजी पोळी आणि भात दोन्ही सोबत टेस्टी लागते. तसेच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना याची चव आवडेल. ही भाजी खायला जेवढी टेस्टी तेवढीच बनवायला सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया टोमॅटो आणि शेवची मसालेदार भाजी कशी बनवायची.

टोमॅटो शेवची भाजी बनवण्यासाठी साहित्य

- एक वाटी बेसन

- मीठ चवीनुसार

- एक चमचा धने पावडर

- अर्धा चमचा हळद

- एक चमचा लाल तिखट

- अर्धा चमचा कलौंजी

- दोन चिमूटभर हिंग

- एक चमचा तेल

ग्रेव्ही बनवण्यासाठी साहित्य

- दोन टोमॅटो बारीक चिरून

- दोन ते तीन टोमॅटोची ग्रेव्ही

- बारीक चिरलेला कांदा

- दोन हिरव्या मिरच्या

- एक चमचा आले लसूण पेस्ट

- एक ते दोन चमचे दही

- दोन चमचे तूप

- एक चमचा जिरे

- दालचिनी

- दोन हिरव्या वेलची

- हिंग

- एक चमचा जिरे पूड

- एक चमचा धने पावडर

- एक चमचा काश्मिरी लाल मिरची

- हळद

- गरम मसाला

- कसुरी मेथी

टोमॅटो शेव भाजी बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम ताजी शेव तयार करा. यासाठी एका भांड्यात बेसन घेऊन त्यात जिरे, कलौंजी, तेल, तिखट, एक चमचा दही, धने पूड, हळद, चवीनुसार मीठ असे सर्व मसाले घालून मिक्स करा. आता त्यात पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. साधारण अर्धा तास बाजूला ठेवा. कढईत तेल टाकून ते गरम करून त्यात शेव बनवून तळून काढा. आता दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तेल आणि तूप घालून गरम करा. आता दालचिनी, वेलची, जिरे, हिरवी मिरची घालून परतून घ्या. नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परता. कांदा भाजून झाल्यावर त्यात धनेपूड, जिरेपूड, हळद, काश्मिरी लाल तिखट घाला. नंतर गरम मसालाही घाला. हे सर्व चांगले परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्या. आता त्यात मीठ घालून वितळू द्या. टोमॅटो वितळायला लागल्यावर टोमॅटोची प्युरी घालून शिजवा. 

संपूर्ण ग्रेव्ही शिजायला लागल्यावर त्यात दोन चमचे ताजे दही घालून मिक्स करा. तसेच कसुरी मेथी घाला. पाणी घालून झाकून ठेवा आणि ग्रेव्ही घट्ट होऊ द्या. ग्रेव्ही घट्ट झाल्यावर त्यात तयार शेव घाला आणि आणखी पाच मिनिटे शिजवा. शेवटी कोथिंबीरने गार्निश करा आणि सर्व्ह करा.