मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Potato Noodles: तु्म्ही कधी बटाट्यापासून बनवलेले नूडल्स खाल्ले आहेत का? मुलांना खूप आवडेल ही रेसिपी

Potato Noodles: तु्म्ही कधी बटाट्यापासून बनवलेले नूडल्स खाल्ले आहेत का? मुलांना खूप आवडेल ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 24, 2024 07:40 PM IST

Recipe for Kids: लहान मुलांना नूडल्स खायला आवडतात. तुम्ही मुलांसाठी घरी नूडल्स बनवण्याचा विचार करत असाल तर यावेळी बटाट्यापासून नूडल्स बनवा. त्यासाठी ही रेसिपी फॉलो करा.

Potato Noodles: तु्म्ही कधी बटाट्यापासून बनवलेले नूडल्स खाल्ले आहेत का? मुलांना खूप आवडेल ही रेसिपी
Potato Noodles: तु्म्ही कधी बटाट्यापासून बनवलेले नूडल्स खाल्ले आहेत का? मुलांना खूप आवडेल ही रेसिपी

Potato Noodles Recipe: नूडल्सचे नाव ऐकताच मुलांच्या तोंडाला पाणी सुटते. पण मुलांनी मागणी केली आणि घरातील नूडल्स संपले असतील तर या नवीन पद्धतीने बनवलेले नूडल्स एकदा ट्राय करा. बाजारातील नूडल्स तुम्ही अनेकदा खाल्ले असतील. पण मुलांना यावेळी काहीतरी वेगळे आणि चवदार खायला द्यायचे असेल तर तुम्ही बटाट्यापासून तयार केलेले चविष्ट नूडल्स पटकन बनवू शकता. त्याची रेसिपी खूप सोपी आहे. मुलांना त्याची चव नक्कीच आवडेल. मुलांप्रमाणेच मोठ्यांना देखील ही नवीन रेसिपी आवडेल. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे बटाट्याचे नूडल्स

ट्रेंडिंग न्यूज

बटाट्यापासून चविष्ट नूडल्स बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- ३ मोठ्या आकाराचे बटाटे

- १०० ग्रॅम कॉर्न फ्लोअर

- चवीनुसार मीठ

- पाणी

बटाट्यापासून नूडल्स बनवण्याची पद्धत

साधारण तीन ते चार बटाटे उकळून घ्या. थंड झाल्यावर त्याचे साल काढून टाका. नंतर हे बटाटे मॅशरच्या मदतीने मॅश करा. आता या बटाट्याच्या मिश्रणात कॉर्न फ्लोअर आणि मीठ मिक्स करा. हे मिश्रण अगदी पिठासारखे मळून घ्या आणि घट्ट करा. आता हातात तेल घ्या आणि गुळगुळीत पृष्ठभागावर थोडे तेल लावा. आता थोडे तयार बटाट्याचे पीठ घ्या आणि हाताच्या मदतीने पातळ करत लाटण्यासारखा आकार द्या. ते शक्य तितके पातळ करा. जेणेकरून त्याला नूडल्ससारखा आकार मिळेल. तसे ते नूडल्ससारखे एकदम पातळ करू नका अन्यथा ते तुटू लागतील. थोडे जाडसर ठेवा. आता एका खोलगट भांड्यात पाणी गरम करून त्यात तयार नूडल्स टाका. दोन ते तीन मिनिटे शिजवा आणि बाहेर काढा. थंड पाण्याने धुवून बाजूला ठेवा. दुसऱ्या गॅसवर पॅन ठेवा आणि तेल घाला. नूडल्स तेलात तळण्यासाठी त्यात बारीक चिरलेला लसूण, चिली फ्लेक्स, सोया सॉस, चिली सॉस घाला. 

तुम्ही त्यात स्प्रिंग ओनियन आणि तुमच्या आवडीच्या भाज्या देखील घालू शकता. आता त्यात तयार नूडल्स घाला आणि हलक्या हाताने ढवळत मिक्स करा. तुमचे चविष्ट बटाटा नूडल्स तयार आहेत. गरमा गरम सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग