Bitter Gourd Sabji Recipe: लहान मुलेच काय पण कारल्याच्या भाजीचे नाव ऐकून मोठे देखील नाक मुरडतात. पण जर तुम्हाला बाजारात ताजी कारली मिळाली तर नक्कीच घरी आणा आणि अशा प्रकारे तयार करा. चटपटीत कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर प्रत्येक जण, मुले आणि मोठे दोघेही खूश होतील. ही रेसिपी बनवायला सोपी आणि खायला टेस्टी आहे. विशेष म्हणजे कारल्याचा कडूपणा अजिबात जाणवत नाही. चला तर मग जाणून घेऊया कारल्याची करी कशी बनवायची.
- कारले
- मोहरीचे तेल
- कांदा उभा चिरलेला
- एक चमचा मीठ
- अर्धा चमचा लाल तिखट
- एक चतुर्थांग चमचा हळद
- एक चमचा धने पावडर
- अर्धा चमचा जिरे पूड
- गरम मसाला
- एक चमचा आमचूर पावडर
- कोथिंबीर
- मीठ
- हळद
- पाणी
सर्वात आधी कारल्याला नीट धुवून हलकेच खरवडून घ्या. आता ते गोलाकार आकारात कापून घ्या. एका बाउलमध्ये कारल्याचे काप घ्या आणि त्यात हळद मीठ घालून मिक्स करा. अर्धा तास पाण्यात ठेवा आणि नंतर ते पाणी गाळून घ्या. आता पॅनमध्ये मोहरीचे तेल घाला. मोहरीच्या तेलाचे प्रमाण थोडे जास्त ठेवावे. जेणेकरून कारले शिजून फ्राय होतील. आता सर्व कारले शिजवून घ्या आणि तेलातून बाहेर काढा. आता उरलेल्या तेलात चिरलेला कांदा टाकून भाजून घ्या. कांदा भाजून लाल झाल्यावर गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी करा. आता यात आधीच तळून घेतलेले कारले मिक्स करा. तसेच मीठ आणि हळद घाला. लाल तिखट, धने पूड, जिरे पूड आणि गरम मसाला एकत्र करून मंद आचेवर झाकून ठेवा आणि पाच मिनिटे शिजू द्या.
सर्व मसाल्यांची चव कारल्यात शोषली गेल्यावर गॅस बंद करून वरून आमचूर पावडर घालून मिक्स करा. तुमची टेस्टी कारल्याची भाजी तयार आहे.
संबंधित बातम्या