मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bread Roll Recipe: झटपट बनवा रवा आणि बटाटाचे ब्रेड रोल, संध्याकाळसाठी आहे परफेक्ट स्नॅक्स

Bread Roll Recipe: झटपट बनवा रवा आणि बटाटाचे ब्रेड रोल, संध्याकाळसाठी आहे परफेक्ट स्नॅक्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 20, 2023 06:26 PM IST

Evening Snacks Recipe: जर तुम्हाला लहान मुलांसाठी ब्रेड आणि मैद्याशिवाय टेस्टी ब्रेड रोल बनवायचा असेल तर तुम्ही रव्याच्या पिठापासून झटपट ब्रेड रोल बनवू शकता. पहा ही क्रिस्पी रेसिपी.

रवा आणि बटाटाचे ब्रेड रोल
रवा आणि बटाटाचे ब्रेड रोल

Semolina and Potato Bread Rolls Recipe: संध्याकाळच्या चहासोबत काही खास पदार्थांची मागणी अनेकदा असते. पण ब्रेड आणि मैद्यापासून बनवलेल्या गोष्टी आरोग्याला हानी पोहोचवतात. अशा परिस्थितीत काहीतरी हेल्दी आणि टेस्टी बनवणे आवश्यक असते. जर तुमच्या मुलांनी तळलेले काहीतरी खाण्याची मागणी केली तर रव्याचे ब्रेड रोल बनवा आणि त्यांना खायला द्या. ते बनवायला जास्त वेळ लागणार नाही आणि टेस्टला सुद्धा चविष्ट आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Eid Special Recipe: ईदच्या दिवशी बनवा खास बंजारा मटण, सगळ्यांना आवडेल ही रेसिपी

रवा ब्रेड रोल बनवण्यासाठी साहित्य

- २ उकडलेले बटाटे

- १ कांदा

- ३ हिरव्या मिरच्या

- १ टीस्पून मीठ

- हळद

- भाजलेले जिरे अर्धा चमचा

- लाल तिखट,

- १ टीस्पून धने पावडर

- अर्धा चमचा चाट मसाला

- १/४ ओवा

- कोथिंबीर

- काळी मिरी पावडर

रव्याचे पीठ कसे तयार करावे

- २ कप पाणी

- १ कप रवा

- १ चमचा तेल

- १ चिमूटभर मीठ

- काश्मिरी लाल तिखट

- हळद

Eid Recipe: शिरखुर्माने वाढवा ईदचा गोडवा, सोपी आहे बनवण्याची पद्धत

रव्याचा ब्रेड रोल बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम रव्याचे पीठ तयार करा. यासाठी कढईत पाणी गरम करून त्यात हळद, तिखट, मीठ घाला. त्यात रवा घालून मिक्स करा आणि पाणी मंद आचेवर कोरडे करा. जेव्हा पाणी सुकेल आणि पिठाची सुसंगतता येईल तेव्हा गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.

बटाट्याचे फिलिंग बनवण्यासाठी उकडलेले बटाटे मॅश करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घाला. ओवा, कोथिंबीर, काळी मिरी, चाट मसाला, भाजलेले जिरे आणि मीठ घालून मिक्स करा. आता हाताला तेल लावा आणि रव्याचे पीठ चांगले मळून घ्या.

Chutney Recipe: जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी बनवा लाल मिरचीची चटणी, झटपट होते तयार

ब्रेड रोल बनवण्यासाठी एका लहान भांड्यात रव्याचे पीठ भरून त्याचे प्रमाण निश्चित करा. आता हातावर पाणी लावून तळहातांच्या मदतीने सपाट करा. मध्यभागी बटाटा भरून ठेवून ते नीट बंद करा. आणि तळव्याने ब्रेड रोलचा आकार द्या. याप्रमाणे सर्व ब्रेड रोल तयार करा. कढईत तेल गरम करून सोनेरी होईपर्यंत तळा. रव्याचे चविष्ट ब्रेड रोल तयार आहेत. हिरव्या चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग