Eid Recipe: शिरखुर्माने वाढवा ईदचा गोडवा, सोपी आहे बनवण्याची पद्धत-how to make sheer khurma recipe for eid ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Eid Recipe: शिरखुर्माने वाढवा ईदचा गोडवा, सोपी आहे बनवण्याची पद्धत

Eid Recipe: शिरखुर्माने वाढवा ईदचा गोडवा, सोपी आहे बनवण्याची पद्धत

Apr 19, 2023 10:26 PM IST

Eid 2023: ईदच्या निमित्ताने स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. यानिमित्ताने पाहुण्यांसाठी काही गोड बनवायचे असेल तर तुम्ही शिरखुर्मा बनवू शकता. ते कसे बनवायचे ते येथे पहा.

शीर खुरमा
शीर खुरमा

Sheer Khurma Recipe: रमजानच्या पवित्र महिन्यानंतर ईदचा सण येणार आहे. या विशेष दिवशी विविध पदार्थ तयार केले जातात. तुम्हालाही या ईदला काहीतरी गोड बनवायचे असेल तर तुम्ही शिरखुर्मा बनवू शकता. शिरखुर्मा हा ईदच्या दिवशी बनवला जाणारा चविष्ट पदार्थ आहे, जो सर्वांना आवडतो. ते कसे बनवायचे ते येथे पहा. 

शिरखुर्मा बनवण्यासाठी तुम्हाला लागेल

- शेवया

- तूप

- दूध

- खजूर (चिरलेला)

- चिरलेला बदाम

- चिरलेला काजू

- चिरलेला पिस्ता

- चिरोंजी

- खरबूजचे बिया

- बेदाणे

- साखर

- वेलची पावडर

Summer Drinks: उन्हाळ्यात रेफ्रेशिंग फील देते वेलचीचे सरबत, नोट करा बनवण्याची पद्धत

कसे बनवावे

- ते बनवण्यासाठी प्रथम एक पॅन घ्या आणि त्यात थोडं तूप घालून गरम करा.

- तूप गरम केल्यानंतर त्यात खसखस, काजू, पिस्ता, बेदाणे, बदाम, चिरोंजी, खरबूजचे बिया घालून २-३ मिनिटे परतून घ्या.

- नंतर शेवया घाला आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत चांगले तळा. 

- शेवया भाजल्यानंतर त्यात थोडं गरम पाणी घालून सगळं नीट मिक्स करा.

- आता आवश्यकतेनुसार दूध घाला.

Bitter Gourd: लंच मध्ये अशा पद्धतीने बनवा कारल्याची भाजी, सगळे खातील आवडीने

- आता त्यात साखर आणि वेलची पूड घालून मिक्स करा. थोडा वेळ शिजवून घ्या. नंतर आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून सर्व्ह करा.

Whats_app_banner
विभाग