मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chutney Recipe: जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी बनवा लाल मिरचीची चटणी, झटपट होते तयार

Chutney Recipe: जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी बनवा लाल मिरचीची चटणी, झटपट होते तयार

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 19, 2023 12:22 PM IST

Red Chilli: उन्हाळ्यात जेवणात सोबत एखादी चटणी असेल तर जेवणाची चव वाढते. झटपट बनवा लाल मिरचीची ही चटणी आणि वाढवा जेवणाची लज्जत.

लाल मिरचीची चटणी
लाल मिरचीची चटणी

Red Chilli Chutney Recipe: रोजच्या जेवणात भाजी पोळी सोबत लोणचं, चटणी, कोशिंबीर असं काही असेल तर जेवणाची चव वाढते. उन्हाळ्यात जेवणाची फार इच्छा नसते. अशावेळी सोबतीला चटणी असेल तर जेवण नीट होते. तुम्ही सुद्धा अशीच एखादी चटणी शोधत असाल तर बनवा ही लाल मिरचीची चटणी. ही चटणी टेस्टी असण्यासोबतच लवकर तयार होते. काही मिनिटात तुम्ही ती बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची लाल मिरचीची चटणी.

Summer Drinks: उन्हाळ्यात रेफ्रेशिंग फील देते वेलचीचे सरबत, नोट करा बनवण्याची पद्धत

टेस्टी लाल मिरची चटणी

लाल मिरचीची चटणी बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- सुक्या लाल मिरच्या - सुमारे ८-१०

- लसणाच्या पाकळ्या - ५० ग्रॅम,

- जिरे - १ चमचा

- काळे मीठ चवीनुसार

- लिंबाचा रस - १ चमचा

- पाणी आवश्यकतेनुसार

Thecha recipe: हिरव्या मिरचीचा ठेचा वाढवेल जेवणाची चव, २ मिनिटात करा तयार

लाल मिरचीच्या चटणीची रेसिपी

झटपट लाल मिरीचीची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सर ग्राइंडरच्या जार मध्ये लसणाच्या पाकळ्या ठेवा. त्यात सोबत लाल मिरची टाका. आता हे नीट बारीक करुन घ्या. आता त्यात जिरे, काळे मीठ आणि लिंबाचा रस घालून पिळून घ्या. हे सर्व नीट बारीक करुन घ्या. आता यात आता दोन ते तीन चमचे पाणी घालून चांगले फिरवून घ्या. नीट गुळगुळीत पेस्ट बनवा. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालू शकता. 

Bitter Gourd: लंच मध्ये अशा पद्धतीने बनवा कारल्याची भाजी, सगळे खातील आवडीने

हे सर्व नीट मिक्स झाले की तुमची टेस्टी लाल मिरचीची चटणी तयार आहे. तुम्ही हे कोणत्याही स्नॅक्स किंवा जेवणासोबत सर्व्ह करु शकता.

WhatsApp channel

विभाग