मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Thecha recipe: हिरव्या मिरचीचा ठेचा वाढवेल जेवणाची चव, २ मिनिटात करा तयार

Thecha recipe: हिरव्या मिरचीचा ठेचा वाढवेल जेवणाची चव, २ मिनिटात करा तयार

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 17, 2023 01:41 PM IST

Chutney Recipe: उन्हाळ्यात जेवणासोबत चटणी किंवा लोणचं खायला सगळ्यांना आवडते. जेवणाची चव वाढवण्यासाठी तुम्ही चटणी बनवण्याचा विचार करत असाल तर ट्राय करा हिरव्या मिरचीच्या ठेचाची ही रेसिपी.

हिरव्या मिरचीचा ठेचा
हिरव्या मिरचीचा ठेचा (pinterest)

Green Chilli Chutney or Thecha Recipe: रोजच्या जेवणातील तिखट मसाला जर फिका पडत असेल तर त्या पदार्थाची चव घरच्यांना कमी आवडते. अशा परिस्थितीत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी एकत्र ठेवू शकता. ते जेवणात फक्त चटपटीतपणा आणणार नाही तर त्याची चवही अप्रतिम होईल. चला तर मग जाणून घेऊया हिरव्या मिरचीचा ठेचा कसा बनवायचा. पहा ही झटपट तयार होणारी रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

Sandwich Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा ग्रील्ड चीज सँडविच, मुले होतील खुश

हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी साहित्य

- १०० ग्रॅम हिरवी मिरची

- १०-१२ लसूण कळ्या

- १ चमचा जिरे

- काळे मीठ चवीनुसार

- तेल १ चमचा

- २ चमचे भाजलेले शेंगदाणे

- कोथिंबीर बारीक चिरून

Breakfast Recipe: उरलेल्या भातापासून बनवा या टेस्टी स्टिक्स, झटपट तयार होतो हा नाश्ता

हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्याची पद्धत

महाराष्ट्रीयन स्टाईल हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा चटणी खूप चवदार असते. ते बनवण्यासाठी प्रथम कढईत तेल गरम करा. नंतर त्यात हिरवी मिरची घाला. लसूण, जिरे, काळे मीठ घालून एकत्र परतून घ्या. मिरच्या आणि लसूण चांगले भाजून झाल्यावर त्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एक मिनिट परतून घ्या आणि गॅस बंद करा. आता एका भांड्यात लसूण आणि हिरव्या मिरच्यांचे मिश्रण ठेवा. सोबत भाजलेले शेंगदाणे घालून चांगले ठेचून घ्या. तुमचा चविष्ट हिरवी मिरचीचा ठेचा तयार आहे. तुम्ही हे बेसन भाकरी, भाजी पोळी किंवा थालीपीठ सोबतही खाऊ शकता.

WhatsApp channel

विभाग