मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sandwich Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा ग्रील्ड चीज सँडविच, मुले होतील खुश

Sandwich Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा ग्रील्ड चीज सँडविच, मुले होतील खुश

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 16, 2023 06:50 PM IST

Evening Snacks Recipe: इव्हनिंग स्नॅक्समध्ये मुलांच्या आवडीचं काही बनवायचं असेल तर झटपट बनवा ग्रील्ड चीज सँडविच. पाहा ही सोपी रेसिपी.

ग्रील्ड चीज सँडविच
ग्रील्ड चीज सँडविच

Grilled Cheese Sandwich Recipe: सँडविच खायला सगळ्यांनाच आवडते. संध्याकाळच्या चहासोबत सँडविच खायचा विचार करत असाल तर तुम्ही हे काही मिनिटात घरी बनवू शकता. मुलांना चीज खायला आवडते तर तुम्ही त्यांच्यासाठी हे ग्रील्ड चीज सँडविच बनवू शकता. हे सँडविच फक्त मुलांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा आवडेल. चला तर मग जाणून घेऊया ग्रील्ड चीज सँडविचची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

हे तयार करण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- पांढऱ्या ब्रेडचे ४ स्लाइस

- ३ चमचे बटर

- २ स्लाइस चीज स्लाइस

कसे बनवावे

सँडविच बनवण्यासाठी प्रथम नॉनस्टिक तवा मध्यम आचेवर गरम करा. नंतर ब्रेडच्या स्लाइसवर बटर चांगले लावा. गरम पॅनमध्ये ब्रेड बटर-साइड खाली ठेवा. नंतर ब्रेडच्या वरच्या बाजूने एक चीज स्लाइस ठेवा. ब्रेडच्या दुसऱ्या स्लाइसच्या एका बाजूला बटर लावा आणि चीजच्या वर बटर केलेली बाजू ठेवा.

एका बाजूला हलका तपकिरी होईपर्यंत शिजवा आणि नंतर पलटवा. चीज वितळेपर्यंत शिजवत रहा. दोन्ही बाजूने चांगले ब्राऊन झाले की तुमचे ग्रील्ड चीज सँडविच तयार आहे. तुम्ही यात चीज सोबत ओरेगॅनो, चीली फ्लेक्स, सँडविच मसाला सुद्धा स्प्रेड करु शकता. तुम्ही तव्याऐवजी ग्रिलिंग मशीन देखील वापरू शकता.

WhatsApp channel

विभाग