Eid Special Recipe: ईदच्या दिवशी बनवा खास बंजारा मटण, सगळ्यांना आवडेल ही रेसिपी
Rajasthani Style Recipe: जर तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांना आणि पाहुण्यांना ईदच्या खास प्रसंगी काहीतरी स्वादिष्ट खायला द्यायचे असेल तर बंजारा मटण बनवा. पारंपारिक राजस्थानी स्टाईलमध्ये तयार केलेली ही मटण डिश नान, रोटी किंवा भातासोबत छान लागते.
Banjara Mutton Recipe: चंद्र दर्शन होतात ईदचा दिवस निश्चित होईल. अशा स्थितीत ईद साजरी करण्यासाठी महिला आपल्या बाजूने विविध प्रकारचे पदार्थ बनवण्यास सुरुवात करतील. तुम्हाला या ईदला कुटुंब आणि मित्रांसाठी काही खास नॉनव्हेज पदार्थ वापरायचे असतील तर राजस्थानी स्टाईल बंजारा मटण बनवा. मटणाची ही रेसिपी खूप स्वादिष्ट आहे आणि सहज तयार होईल. चला तर मग जाणून घेऊया साध्या मसाल्यांनी तयार केलेली मटणाची अप्रतिम डिश.
ट्रेंडिंग न्यूज
Eid Recipe: शिरखुर्माने वाढवा ईदचा गोडवा, सोपी आहे बनवण्याची पद्धत
बंजारा मटण बनवण्यासाठी साहित्य
- १/२ किलो मटण
- १/२ कप दही
- १ कांदा, बारीक चिरलेला
- ५ लाल मिरच्या
- कोथिंबीर
- २ काळ्या किंवा मोठ्या वेलची
- ३ जावित्री
- ३-४ छोटी किंवा हिरवी वेलची
- ४-५ काळी मिरी
- १ चमचा जिरे
- १/२ चमचे धणे
- लाल तिखट
- हळद
- ३ वाट्या पाणी
- २ चमचे तेल
- मीठ चवीनुसार
Chutney Recipe: जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी बनवा लाल मिरचीची चटणी, झटपट होते तयार
बंजारा मटण बनवण्याची पद्धत
- सर्वप्रथम मटण धुवून कापून घ्या.
- नंतर प्रेशर कुकरमध्ये चिमूटभर मीठ टाकून शिजवून घ्या. साधारण एक ते दोन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करून कुकर थंड होऊ द्या.
- मिक्सरच्या भांड्यात छोटी वेलची, मोठी वेलची, दालचिनी, जावित्री, काळी मिरी आणि जिरे टाकून पावडर बनवा.
Summer Drinks: उन्हाळ्यात रेफ्रेशिंग फील देते वेलचीचे सरबत, नोट करा बनवण्याची पद्धत
- आता एका जाड तळाच्या पॅनमध्ये तेल टाकून गरम करा. नंतर बारीक चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
- आता सोबत लाल मिरची घाला.
- त्यानंतर आले-लसूण पेस्ट, धने पावडर, हळद आणि ताजा गरम मसाला घालून चांगले परतून घ्या.
- पाणी घालून उकळी येईपर्यंत शिजवा.
Bitter Gourd: लंच मध्ये अशा पद्धतीने बनवा कारल्याची भाजी, सगळे खातील आवडीने
- नंतर मसाल्यामध्ये मटण मिक्स करा आणि मटणाचा स्टाक वेगळ्या भांड्यात ठेवा. मटण आणि मसाले शिजल्यावर त्यात स्टाक घालून दह्याबरोबर मिक्स करा. जेणेकरून दही फुटणार नाही.
- आता ठेचलेले धणेचे दाणे टाका आणि मंद आचेवर अर्धा तास शिजू द्या. शेवटी कोथिंबीरीने सजवा आणि रोटी, नान किंवा भातासोबत गरमागरम सर्व्ह करा.
विभाग