Healthy Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता महत्त्वाचा असतो. सकाळीसाठी हेल्दी आणि चविष्ट नाश्ताचे पदार्थ शोधत असतात. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय चविष्ट मूग डाळ चील्याची रेसिपी. लहान मुलं असोत की मोठी, मुगाची डाळ खायला अनेकांना आवडत नाही. पण तुम्ही यापासून हटके रेसिपी बनवू शकता. डाळीपासून एकदा चीला बनवला तर सगळ्यांना नक्कीच आवडेल. तसेच मूग डाळ आरोग्यासाठी उत्तम आहे. अशा परिस्थितीत सकाळी घरीच हा सोपा मूग डाळ चीला बनवा. ही डिश इतकी टेस्टी आहे की, हा चीला तुम्ही इतर कशापासून नाही तर मूग डाळीपासून बनवला आहे हे कोणालाही कळणार नाही. चला चिला बनवण्याची झटपट रेसिपी जाणून घेऊयात.
हिरवी साल असलेली मूग डाळ - पाण्यात भिजवलेली, ४-५ लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, हिंग, चवीनुसार मीठ, शुद्ध तेल
> सर्वप्रथम भिजवलेली मूग डाळ घ्या आणि पाण्याने नीट धुवा.डाळ ४ ते ५ तास भिजवून ठेवल्यानंतर डाळ फुगते आणि डाळ साले वेगळी होते. पाण्याने धुताना सर्व साले आणि डाळ वेगवेगळे करून घ्या.
> यानंतर डाळी मिक्सरच्या भांड्यात टाका. मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडे पाणी, किमान ४ ते ५ चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ४ ते ५ पाकळ्या लसूण टाका आणि मग मिक्सरची भांडी बंद करून पुन्हा बारीक करा.
> डाळ बारीक झाल्यावर एका भांड्यात काढून हाताने ५ ते ८ मिनिटे फेटून घ्या. यानंतर डाळीत चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हिंग घालून मिक्स करा. आता तुमची डाळ चीला बनवायला तयार आहे.
> आता गॅसवर पॅन मंद आचेवर ठेवा. यासाठी तुम्ही नॉनस्टिक किंवा कोणतेही सामान्य पॅन घेऊ शकता. तव्यावर थोडे रिफाइंड तेल टाका आणि गरम होऊ द्या.
> आता डाळीचे मिश्रण एका लहान वाडग्यात किंवा खोलगट लाडू घेऊन तव्याच्या मधोमध ओतून हलक्या हाताने पसरवा.
> यानंतर चिल्याभोवती थोडेसे तेल घाला. एक बाजू हलकी तपकिरी झाली की, चीला स्पॅटुला लावून फिरवा.
> आता ही बाजूही मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा.
> दोन्ही बाजूंनी हलका सोनेरी तपकिरी शिजल्यावर चीला प्लेटमध्ये काढून घ्या.