Healthy Summer Breakfast Recipe: उन्हाळ्यात सकाळी योग्य नाश्ता करणे फार गरजेचे आहे. आधीच गर्मीमुळे आपलं शरीर डिहायड्रेट होत. गर्मीमुळे काही खावंसंही वाटतं नाही. अशावेळी पोटाला थंडावा देईल आणि पोषण देशील अशा डिशच्या शोधात सगळे असतात. फळांचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. शरीरात प्रथिनांचे प्रमाण योग्य असल्याने अशक्तपणा जाणवत नाही आणि ऊर्जा राहते. उन्हाळ्यात फळांचे दही बनवून खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते. दह्यासोबत तुमच्या हव्या त्या फळाच्या चवीनुसार तुम्ही फ्रुट योगर्ट बनवू शकता. दही हे दुधाला आंबवून तयार केले जाते, त्यामुळे त्याला प्रोबायोटिक्सचा उत्तम स्रोत मानला जातो. त्यात काही हंगामी आणि ताजी फळे टाकून, तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता. उन्हाळ्यात हा एक उत्तम ठरू शकतो. फळे ऊर्जा आणि इतर पोषक तत्त्वे देतात आणि दही पचनासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे नाश्त्यात फ्रुट योगर्ट खाणे हा एक चांगला पर्याय आहे.
दह्यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात, जे खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात फ्रेश फळे आणि सुका मेवा घातल्याने त्याचे पौष्टिक मूल्य वाढते. दही बनवण्यासाठी दूध, हंगामी फळे आणि साखर वापरली जाते. तुम्ही हे फक्त ३० मिनिटांत बनवू शकता आणि सर्व्ह करू शकता.
> दूध उकळून ३७-४०⁰C तापमानावर ठेवा.
> फळे धुवा, सोलून घ्या आणि लहान तुकडे करा.
> यानंतर दुधात फळांचा लगदा, फळांचे तुकडे आणि चिरलेला सुका मेवा घाला.
> आता त्यात २ चमचे दही कल्चर टाकून चांगले मिक्स करा.
> हे मिश्रण झाकून ठेवा आणि उबदार ठिकाणी उबवा.
> ६ ते ८ तास अजिबात ढवळू नका पूर्णपणे सेट करा.
> फळे, फ्रूट सॉस आणि ड्राय फ्रूट्स सोबत दही पूर्णपणे सेट केले जाईल.
> थंड होऊ द्या आणि सर्व्ह करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)
संबंधित बातम्या