मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bhapa Doi: डेझर्टमध्ये बनवा बंगाली स्वीट डिश भापा दोई, १० मिनिटात होते तयार

Bhapa Doi: डेझर्टमध्ये बनवा बंगाली स्वीट डिश भापा दोई, १० मिनिटात होते तयार

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 10, 2023 09:29 PM IST

Bengali Sweet Dish Recipe: तुम्हाला सुद्धा बंगाली मिठाई खायला आवडत असेल तर डेझर्टमध्ये ट्राय करा भापा दोई. पहा ही झटपट तयार होणारी रेसिपी.

भापा दोई
भापा दोई

Bhapa Doi Recipe: तुम्हाला डेझर्टमध्ये काहीतरी वेगळे आणि टेस्टी ट्राय करायचे असेल तर तुम्ही बंगाली डिश भापा दोई बनवू शकता. त्याची चव कमी गोड असून ती रबडीसारखी दिसते. ती बनवण्याची आणि सर्व्ह करण्याची पद्धत इतर मिठाईपेक्षा खूप वेगळी आहे. याची चव तुम्ही घरच्या घरी काही मिनिटांमध्ये चाखू शकता. पहा त्याची ही सोपी रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

भापा दोई बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- २ कप दही

- १ कप कंडेन्स्ड मिल्क

- ३/४ टीस्पून वेलची पावडर

- मूठभर गुलाबाच्या पाकळ्या

- केशर

कसे बनवावे

भापा दोई बनवण्यासाठी दही काही वेळ सुती कपड्यात बांधून ठेवा. हे किमान दोन तास करा. दह्यातील सर्व पाणी काढून टाकल्यावर दही एका भांड्यात काढून घ्या. नंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क आणि वेलची पावडर घालून मिक्स करा. केक टिन ग्रीस करा आणि त्यात हे मिश्रण टाका. फॉइलने झाकून ठेवा. त्याच बरोबर दुसऱ्या भांड्यात पाणी गरम करून स्टँड ठेवा. केक टिन त्यात ठेवा आणि नंतर २० मिनिटे वाफ येऊ द्या. वाफवल्यावर टूथ पिकने तपासा आणि नंतर थंड झाल्यावर प्लेटमध्ये काढा. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या आणि केशराने गार्निश करा.

WhatsApp channel

विभाग