मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Faluda Recipe: कुल्फीची मजा डबल करतो फालुदा, फक्त एका साहित्याने बनवा घरीच

Faluda Recipe: कुल्फीची मजा डबल करतो फालुदा, फक्त एका साहित्याने बनवा घरीच

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 08, 2023 09:12 PM IST

Summer Special Recipe: तुम्ही कुल्फी तर अनेक वेळा घरी बनवली असेल पण तुम्ही घरी फालुदा बनवले आहे का? फक्त एका घटकाने फालुदा पटकन आणि काही मिनिटांत तयार करा. ही आहे फालुदा बनवण्याची रेसिपी.

फालुदा
फालुदा

Kulfi Faluda Recipe: कुल्फीची मजा फालुदासोबत दुप्पट होते. अनेकदा लोक घरच्या घरी कुल्फी तयार करतात पण त्यांना फालूदा बनवणं अवघड जातं. जर तुम्हालाही असे वाटत असेल की फालुदा बनवणे अवघड काम आहे, तर ही रेसिपी जाणून घेतल्यावर तुम्ही काही मिनिटांत ते तयार करू शकाल. आता उन्हाळ्यात अनेक वेळा कुल्फी बनवाल. तर त्यासोबत आता फालुदा सुद्धा घरीच बनवा. चला तर मग जाणून घेऊया काही मिनिटांत फालुदा कसा बनवायचा.

ट्रेंडिंग न्यूज

फालुदा बनवण्यासाठी साहित्य

- १ कप कॉर्नस्टार्च

- गुलाब जल

- १ टीस्पून साखर

फालुदा बनवण्याची पद्धत

घरच्या घरी फालुदा बनवणे खूप सोपे आहे. ते बनवण्यासाठी एका भांड्यात कॉर्नस्टार्च घ्या. आता त्यात थोडे गुलाबजल आणि कॉर्नस्टार्च नुसार एक किंवा दोन चमचे साखर घाला. पाणी घालून पातळ द्रावण तयार करा. द्रावण तयार करताना लक्षात ठेवा की त्यात गुठळ्या राहू नयेत. त्यामुळे चमच्याने सतत ढवळत राहा. जर या दरम्यान गुठळी असेल तर हाताच्या मदतीने काढून टाका आणि चांगले मिक्स करा. आता एक नॉनस्टिक पॅन घ्या. ते गरम करा आणि कॉर्नस्टार्चचे द्रावण त्यात टाका. द्रावण खूप घट्ट आणि स्टिकी होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. शिजवल्यानंतर कॉर्नस्टार्च खूप घट्ट आणि चिकट होईल आणि पारदर्शक दिसू लागेल.

फालूदा बनवण्याची पद्धत

फालुदा बनवण्यासाठी शेव किंवा शेवया बनवणारा साचा घ्या आणि त्यात गरम कॉर्नस्टार्चचे द्रावण टाका. हे लक्षात ठेवा की ते खूप गरम असावे, अन्यथा फालुदा नीट बनणार नाही. आपले हात जळू नयेत म्हणून मशीन पकडण्यासाठी कापड वापरा. आता एका खोलगट भांड्यात बर्फाचे थंड पाणी घ्या. गरम कॉर्नस्टार्चचे द्रावण शेवया मशिनमध्ये टाका आणि फालुदा बनवा. ते थेट थंड पाण्यात बनवा. तुमचा फलुदा तयार आहे. थंड पाण्यातून काढून कुल्फीसोबत सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग