मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  संध्याकाळच्या चहासोबत घ्या कोथिंबीर बटाटा चिप्सची मजा, खूप टेस्टी आहे ही इंस्टंट रेसिपी

संध्याकाळच्या चहासोबत घ्या कोथिंबीर बटाटा चिप्सची मजा, खूप टेस्टी आहे ही इंस्टंट रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 10, 2023 06:33 PM IST

Snacks Recipe: संध्याकाळच्या चहासोबत बटाटा वेफर्स खायला तर सगळ्यांनाच आवडतात. पण आज ट्राय करा कोथिंबीर बटाटा चिप्स. पहा ही इंस्टंट रेसिपी.

कोथिंबीर बटाटा चिप्स
कोथिंबीर बटाटा चिप्स (freepik)

Crispy Coriander Potato Chips Recipe: इव्हनिंग स्नॅक्समध्ये काही हलकं फुलकं खायचे असेल तर चिप्स हे चांगला ऑप्शन आहे. बटाटाच्या चिप्स तर तुम्ही नेहमीच खात असाल. आज त्याला कोथिंबीरचा ट्विस्ट द्या आणि चहाची मजा डबल करा. कोथिंबीर बटाटा चिप्स खायला जेवढे टेस्टी आहेत तेवढीच सोपी त्याची रेसिपी आहे. जाणून घ्या कसे बनवायचे कोथिंबीर बटाटा चिप्स.

क्रिस्पी कोथिंबीर बटाटा चिप्स बनवण्यासाठी साहित्य

- २ बटाटे (चिप्सच्या आकारात कापून)

- ५० ग्रॅम कोथिंबीर (पाने वेगळी केलेली)

- ३ चमचे तांदळाचे पीठ

- चिमूटभर लाल तिखट

- तळण्यासाठी तेल

- चवीनुसार मीठ

कोथिंबीर बटाटा चिप्स बनवण्याची पद्धत

क्रिस्पी कोथिंबीर बटाटा चिप्स बनवण्यासाठी प्रथम मध्यम आकाराचे बटाटे घ्या आणि ते पातळ कापून घ्या. नंतर बटाट्याचे चिप्स उकळत्या पाण्यात किंवा कोमट पाण्यात ठेवा आणि २ मिनिटांनी बाहेर काढा. आता एका कागदावर बटाटे वेगळे ठेवून बटाट्याचा सर्व स्टार्च काढा. बटाटे चांगले सुकल्यावर एक एक करुन बटाट्याच्या चिप्सवर कोथिंबीरचे पाने ठेवा. नंतर त्यावर थोडं तांदळाचं पीठ टाकून त्यावर आणखी एक बटाटा चिप्स ठेवा. आता गरम तेलात एक एक करून तळून घ्या. तळून झाल्यावर टिश्यू पेपरवर काढा. तुमची इंस्टंट क्रिस्पी कोथिंबीर बटाटा चिप्स तयार आहेत. आता चिप्सवर मीठ, चाट मसाला आणि लाल तिखट घालून चहासोबत सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग