मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Recipe: कोथिंबीर-पुदीना नाही तर ट्राय करा कांद्याची चटणी, सोपी आहे रेसिपी

Summer Recipe: कोथिंबीर-पुदीना नाही तर ट्राय करा कांद्याची चटणी, सोपी आहे रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 10, 2023 01:41 PM IST

जेवणासोबत एखादी चटणी असेल तर मजा द्विगुणीत होतो. नेहमीची कोथिंबीरची चटणी नाही तर बनवा कांद्याची चटणी. ट्राय करा ही रेसिपी.

कांद्याची चटणी
कांद्याची चटणी (unsplash)

Onion Chutney Recipe: तुम्ही आजपर्यंत अनेक वेळा कोथिंबीर पुदिनाची चटणी खाल्ली असेल. पण अशीच एक चटणी आहे, जी उन्हाळ्यासाठी बेस्ट आहे. या चटणीचे नाव कांद्याची चटणी आहे. ही चटणी फक्त चवीला चांगली नाहिये तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. ही चटणी तुम्ही डाळ भात, पोळी भाजी किंवा इतर कोणत्याही स्नॅक्ससोबत सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कशी बनवली जाते ही चटपटीत चटणी.

कांद्याची चटणी बनवण्यासाठी साहित्य

- ५ ते ६ कांदे

- १/४ कप तेल

- १० - १५ पाकळ्या लसूण

- २- ३ चमचे चिंच

- १ टीस्पून उडीद डाळ

- १/४ टीस्पून कलोंजी

- मेथी दाणे

- १ टेबलस्पून बडीशेप

- १ टीस्पून काश्मिरी लाल तिखट

- १ टीस्पून जिरे

- १ टेबलस्पून कोथिंबीर

- ४- ५ संपूर्ण लाल मिरची

- मीठ

कांद्याची चटणी बनवण्याची पद्धत

चटपटीत कांद्याची चटणी बनवण्यासाठी प्रथम कांदा सोलून घ्या, नीट धुवून स्वच्छ करा. यानंतर कांद्याचे पातळ काप करून बाजूला ठेवा. आता एका पॅनमध्ये एक चतुर्थांश कप तेल टाका आणि त्यात लसूण पाकळ्या काही सेकंद शिजवा. आता त्यात चिरलेला कांदा घालून मध्यम आचेवर शिजवा. कांदा जास्त ब्राऊन होणार नाही याची काळजी घ्या. आता त्यात चिंच टाका. आता गॅसची आंच मंद करा आणि कांद्याबरोबर चिंच शिजवा. गॅस बंद करून थंड होऊ द्या.

आता आणखी एक लहान पॅन घ्या. त्यात धणे, बडीशेप आणि जिरे घालून मंद आचेवर भाजून घ्या. काही सेकंदांनंतर त्यात अख्खी लाल मिरची घाला. आता गॅस बंद करून त्यात थोडे मेथीचे दाणे टाका.आता हे मसाले थंड झाल्यावर ग्राइंडरच्या मदतीने बारीक करून घ्या. आता एका भांड्यात मसाले काढा. यानंतर, कांद्याचे मिश्रण देखील बारीक करा. यात हे मसाले मिक्स करा. तुमची कांद्याची चटणी तयार आहे.

WhatsApp channel

विभाग