मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Evening Snacks साठी बनवा ग्रील्ड चीज सँडविच, झटपट तयार होते ही रेसिपी

Evening Snacks साठी बनवा ग्रील्ड चीज सँडविच, झटपट तयार होते ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 09, 2023 04:47 PM IST

चहा कॉफी सोबत सँडविच खायला अनेकांना आवडतात. तुम्हाला सुद्धा आवडत असेल तर ट्राय करा ग्रील्ड चीज सँडविचची ही रेसिपी.

ग्रील्ड चीज सँडविच
ग्रील्ड चीज सँडविच (unsplash)

Grilled Cheese Sandwich: जर तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट पर्याय शोधत असाल, तर तुम्ही ग्रील्ड चीज सँडविचची ही टेस्टी रेसिपी ट्राय करु शकता. ही रेसिपी केवळ पटकन तयार होत नाही तर लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल. चला तर मग जाणून घेऊया ही चविष्ट रेसिपी ग्रील्ड चीज सँडविच कसे बनवायचे.

ग्रील्ड चीज सँडविच बनवण्यासाठी साहित्य

- ब्रेड - ४ स्लाइस

- चीज - २ चमचे

- टोमॅटो - १ चिरलेला

- कांदा - १ चिरलेला

- काळी मिरी पावडर - १/२ टीस्पून

- बटर - १/२ टीस्पून

- चाट मसाला - १/२ टीस्पून

- कोथिंबीर - १ टीस्पून

- मीठ - चवीनुसार

ग्रील्ड चीज सँडविच बनवण्याची पद्धत

ग्रील्ड चीज सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम ब्रेडवर चीज लावून त्यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मीठ घालून नीट पसरवा. यानंतर, एक ब्रेड दुसऱ्याच्या वर ठेवून, ब्रेडवर हलके बटर लावा. आता सँडविच ग्रील गरम करून दोन्ही बाजू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ग्रील करा. तुमची टेस्टी ग्रील्ड चीज सँडविच तयार आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता.

WhatsApp channel

विभाग