मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Upma Recipe: सकाळच्या नाश्त्याची चिंता सोडा, झटपट बनवा रव्याचा उपमा

Upma Recipe: सकाळच्या नाश्त्याची चिंता सोडा, झटपट बनवा रव्याचा उपमा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 10, 2023 09:08 AM IST

Breakfast Recipe: सकाळच्या गडबडीत नाश्ता बनवायला जास्त वेळ नाही? तर तुमची समस्या सोडवेल ही झटपट बनवणारी रेसिपी.

रव्याचा उपमा
रव्याचा उपमा (freepik)

Rava Upma Recipe: दररोज कोणता नाश्ता बदलायचा हे ठरवणे अनेकांना अवघड जाते. विशेषतः जे लोक नोकरी करतात किंवा ज्यांना सकाळी लवकर काहीतरी बनवायचे असते. तुम्हालाही ही समस्या असेल तर तुम्ही रव्याचा उपमा बनवू शकता. खायला चविष्ट असणारी ही रेसिपी बनवायला देखील सोपी आहे. याशिवाय हे आरोग्यासाठीही चांगले आहे. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. येथे जाणून घ्या रव्याचा उपमा बनवण्याची रेसिपी.

साहित्य

- रवा - दोन वाट्या

- बारीक चिरलेला कांदा

- बारीक चिरलेला टोमॅटो

- बारीक चिरलेले गाजर

- बारीक चिरलेली कोथिंबीर

- बारीक चिरलेली हिरवी मिरची

- लाल मिरची

- शेंगदाणे

- मोहरी

- उडीद डाळ

- हरभरा डाळ

- जिरे

- कढीपत्ता

- तेल किंवा तूप

- मीठ

- पाणी

पद्धत

रव्याचा उपमा बनवण्यासाठी प्रथम रवा खमंग भाजून घ्या. पॅनमध्ये मंद आचेवर रवा भाजल्यावर बाजूला काढून ठेवा. आता पॅनमध्ये २ चमचे तेल किंवा तूप टाका. आता त्यात मोहरी आणि जिरे घालून फोडणी करा. यानंतर उडीद डाळ घाला. यानंतर त्यात अर्धा चमचा हरभरा डाळ घालून थोडे शिजवावे. यानंतर त्यात शेंगदाणे घाला. शेंगदाणे शिजायला लागल्यावर त्यात कढीपत्ता घाला. यानंतर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, गाजर घालून भाजून घ्या. यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घाला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात वाटाणे आणि स्वीट कॉर्न देखील घालू शकता. आता थोडे मीठ, लाल तिखट घाला. यानंतर सर्व काही व्यवस्थित मिक्स करा. आता दोन कपपेक्षा थोडे जास्त पाणी घालून उकळा.

तुम्ही यात वाटाणा टाकला असेल तर पाणी जास्त घ्या, नाहीतर अडीच कप पाणी पुरेसे आहे. लक्षात ठेवा की मोजण्यासाठी तोच कप घ्या ज्यातून रवा मोजला होता. आता त्यात हळूहळू रवा घाला आणि चमच्याने ढवळत राहा. आता सर्व काही चांगले मिक्स करा. रवा फुगलेला दिसेल. गॅसची आच बंद करून झाकून ठेवा. आता कोथिंबिरीने सजवा आणि गरमा गरम सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग