बॉलिवूड कलाकार, श्रीमंत उद्योगपती आणि क्रिकेटपटू हे त्यांच्या कामासोबतच लग्झरी लाइफसाठी विशेष ओळखले जातात. त्यांच्या गाड्या, कपडे, घरे आणि इतर अनेक गोष्टी चाहत्यांचे आकर्षण ठरत असते. पण तुम्हाला माहिती आहे का या श्रीमंत लोकांची हेअरस्टाइल कोण करते? चला जाणून घेऊया...
बॉलिवूड कलाकारांच्या हेअरस्टाइलबाबत कायमच चर्चा रंगलेल्या असतात. गेल्या महिन्यात अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अभिषेक आणि अमिताभ बच्चन हे मुंडण करत होते. पण त्यांचे मुंडन करणारा हेअर स्टायलिस्ट कोण होता? असा प्रश्न सर्वांना पडतो. हा स्टायलिस्ट हकीम कैरनवी आहे. त्याने अनेक बड्या कलाकारांची देखील हेअरस्टाइल केली आहे.
वाचा: मी त्यांना बाबा म्हणू शकत नाही; सिद्धार्थ चांदेकरची आईच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट हकीम कैरनवी हा मुंबईतील भेंडी बाजारात राहातो. त्याने अमिताभ बच्चन, सुनील दत्त, मेहमूद, मुकेश अंबानी यांचे केस कापले आहेत. पण अचानक हकीमचे निधन झाले. अल्पशा आजारामुळे हकीमचे निधन झाले. त्यानंतर त्याचा मुलगा आलिम हा ९ वर्षांचा असताना हेअरस्टाइल करायला शिकला. कुटुंबाला हातभार लावता यावा यासाठी त्याने कैची हाती घेतली. तो स्वत: केस कापू लागला.
वाचा: हेमंत ढोमेचे खरे आडनाव तुम्हाला माहिती आहे का? स्वत: केला खुलासा
अगदी सुरुवातीच्या काळात आलिमने घरच्या घरी केस कापण्यास सुरुवात केली होती. ते सर्वांकडून केवळ २० रुपये फी म्हणून घेत असे. हे काम करत असताना आलिम दुसरीकडे शिक्षण देखील घेत होता. त्याने मुंबईतील मिठाबाई कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. जेव्हा कॉलेजमधील मुलांना आलिमच्या कामाविषयी कळाले तेव्हा ते त्याची खिल्ली उडवत असत. पण आलिमचा त्याच्या कामावर पूर्ण विश्वास होता. पदवीधर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आलिमने मुंबईतील ताज हॉटेलमधील मॅडम जॅक सलूनमध्ये हेअरस्टायलिस्ट म्हणून काही दिवस काम केले. या सलूनने आलिमला खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्याने भेंडी बाजारात स्वत:चे एक मोठे सलून उघडले. अनेक बडे कलाकार लग्झरी गाड्यांमधून उतरुन त्याच्याकडे केस कापण्यास जात. परदेशातील अनेक कॉलेजमधून आलिमला प्रशिक्षण देण्यासाठी बोलावण्यात आले होते.
आलिमला त्याच्या हेअर स्टाइलमुळे इतकी प्रसिद्धी मिळाली की सुपरस्टार रजनीकांत, सुनील शेट्टी, सलमान खान, महेश बाबू, संजय दत्त, हृतिक रोशन, कतरिना कैफ, राम चरण, विजय देवरकोंडा आणि इतर काही लोकप्रिय कलाकार हे त्याच्याकडून हेअर स्टाईल करुन घेत.