कलाकार हे कामयच त्यांच्या चित्रपटांसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. चाहत्यांना देखील कलाकारांच्या खासगी आयु्ष्याविषयी जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरविषयी देखील जाण्यास सर्वजण उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थच्या आईने दुसरे लग्न केले. पण त्यांच्या लग्नानंतरही सिद्धार्थ वडिलांना बाबा म्हणून आवज देत नाही. स्वत: सिद्धार्थने एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे.
सिद्धार्थ एका मुलाखतीमध्ये त्याला त्याचे वडिल कोण आहेत किंवा त्याच्याविषयी फार काही माहिती नाही. पण आईने दुसरे लग्न केल्यानंतर मनात असलेल्या बाबांची जागा दुसरं कोणाला देऊ शकत नाही. त्यामुळे सावत्र वडिलांना काका म्हणून आवाज देत असल्याचे सांगितले आहे. 'ज्यांनी मला या जगात आणले ते आज कुठे आहेत हे मला माहिती नाही. असे जरी असले तरी ते माझे बाबा आहेत. कितीही काही झाले तरी ते माझ्यासाठी बाबा आहेत, माझ्या वडिलांशी माझा कधीही संपर्क झालेला नाही. ते कुठे आहेत, काय करतात याविषयी मला माहिती नाही. पण मी त्यांची जागा इतर कुणालाही देऊ शकत नाही. मी कुणालाही बाबा म्हणू इच्छीत नाही' असे सिद्धार्थ म्हणाला.
वाचा: अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात, फोटो पाहून चाहते झाले चकीत
पुढे या मुलाखतीमध्ये सिद्धार्थने सावत्र वडिलांचा उल्लेख करत, 'मी त्यांचा आदर करतो. त्यांचे आणि माझे नाते खूप सुंदर आहे. पण मी त्यांना काका म्हणून आवाज देतो. मी त्यांना काय आवाज देतो याचा काहीच फरक पडत नाही.'
वाचा: विमान आहे की रेल्वे; असे का म्हणाला स्वप्निल जोशी? वाचा
सिद्धार्थ त्याची पत्नी मिताली मयेकरच्या वडिलांना सुद्धा बाबा म्हणून आवाज देत नाही. स्वत: सिद्धार्थने या मुलाखतीमध्ये याबाबत उलघडा केला आहे. 'मिताली मला अनेकदा म्हणते की माझ्या वडिलांना तू बाबा म्हण.. पण मी नाही म्हणू शकत. माझ्या मनात असलेल्या त्या भावन फक्त त्याच व्यक्तीसाठी आहेत. माझ्यासाठी हे एकच नाते असे नाही. मी माझ्या आईशिवाय कुणालाही आई म्हणू शकत नाही. मी माझ्या सख्ख्या ताईला सोडून कुणालाही ताई म्हणत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीशी माझ्या वेगळ्या भावना जोडलेल्या आहेत आणि त्या त्याच व्यक्तीसाठी आहेत. तसेच वडील ही माझ्यासाठी एकच आहेत. त्यामुळे मी त्यांना काका म्हणतो' असे सिद्धार्थ म्हणाला.