मराठी चित्रपटसृष्टीमध्ये 'झिम्मा', 'झिम्मा २', 'सनी', 'सातारचा सलमान', 'बघतोस काय मुजरा कर' या सारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारा अभिनेता म्हणजे हेमंत ढोमे. आज हेमंतचा वाढदिवस आहे. हेमंत त्याचा ३८वा वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने हेमंतची पत्नी अभिनेत्री क्षिती जोगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने हेमंतचे खरे आडनाव काय आहे हे सांगितले आहे.
हेमंत आणि क्षिती हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. दोघे सतत एकमेकांसोबत वेळ घालवताना, डिनर डेटला जातानाचे फोटो शेअर करताना दिसतात. आज क्षितीने हेमंतच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केली आहे. तिने हेमंतसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने हॅशटॅग Happypatil असे कॅप्शन दिले आहे. क्षितीने असे कॅप्शन का दिले आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: अरुंधतीची प्रकृती गंभीर, कुटुंबीयांनी चाहत्यांकडे केली मदतीची मागणी
क्षितीने पती हेमंत ढोमेचा वाढदिवस असल्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर केली आहे. या पोस्टमध्ये तिने हेमंत सोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तिने 'पार्टनर तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. तू नेहमीच कथा सांगत रहा.. स्वप्न पाहात रहा, कठीण काम करत रहा, नेहमीच आनंदी रहा आणि स्वत:वर विश्वास ठेव.. माझे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे...' या आशयाचे कॅप्शन दिले आहे. यासोबतच तिने हॅशटॅग हॅप्पी पाटील असे म्हटले आहे. आता क्षितीने असा हॅशटॅग का वापरला असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: शाहिद कपूरने भर कार्यक्रमात विजय देवरकोंडाला केले किस
हेमंत ढोमे हा कायमच माध्यमांशी संवाद साधत असतो. मग सोशल मीडियाच्या माध्यमातून असो वा मुलाखतींच्या माध्यमातून. नुकताच हेमंतने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने खरे आडनाव सांगितले आहे. 'आमचे मूळ आडनाव हे ढोमे पाटील असे आहे. माझे नातेवाईक हेच आडनाव लावतात. पण माझे वडील हे पोलिसात असल्यामुळे त्यांनी कधीही पाटील आडनाव लावले नाही. त्यांच्यानंतर मीही लावले नाही. जेव्हा माझे क्षितीसोबत लग्न झाले तेव्हा तिला असे मोठे आडनाव हवे होते. त्यावेळी मी तिला सांगितले की आमचे खरे आडनाव ढोमे पाटीला आहे. तेव्हापासून ती मला पाटील आवाज देते आणि मी तिला पाटलीणबाई असा अवाज देतो' असे हेमंत म्हणाला.
संबंधित बातम्या