मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vivek Agnihotri : ममता बॅनर्जींवर संतापले विवेक अग्निहोत्री; म्हणाले ‘मी मानहानीचा दावा करू शकतो...’

Vivek Agnihotri : ममता बॅनर्जींवर संतापले विवेक अग्निहोत्री; म्हणाले ‘मी मानहानीचा दावा करू शकतो...’

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 09, 2023 09:37 AM IST

Vivek Agnihotri Angry On Mamta Banerjee: ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेत ‘द केरळ स्टोरी’वर बंदी घातळ्याची घोषणा केली. त्यादरम्यान त्यांनी विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचाही उल्लेख केला.

Vivek Agnihotri Angry On Mamta Banerjee
Vivek Agnihotri Angry On Mamta Banerjee

Vivek Agnihotri Angry On Mamta Banerjee: बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा स्टारर चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ सतत काहीना काही वादात अडकत आहे. एकीकडे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत असतानाच, दुसरीकडे तो अनेक वादांना तोंड देत आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणीही अनेक ठिकाणी होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यात या चित्रपटावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली होती. त्यादरम्यान त्यांनी गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचाही उल्लेख केला. ज्यानंतर आता विवेक अग्निहोत्री त्यांच्यावर संतापलेले दिसत आहे. ‘द काश्मीर फाईल्स’लाही अशाच अनेक वादांना सामोरे जावे लागले होते. ममता बॅनर्जी यांनी या पत्रकार परिषदेत दावा केला की, भाजप काही स्टार्सना निधी पुरवते. आता तो व्यक्ती बंगाल फाईल्स नावाचा चित्रपट बनवत असून, तो बंगालमध्येही आला होता. यावेळी त्यांनी द काश्मीर फाईल्सचाही उल्लेख केला आणि हा चित्रपट काश्मिरी लोकांची बदनामी करण्यासाठी बनवण्यात आल्याचे म्हटले.

Get Together: पहिल्या प्रेमाची आठवण सांगणारा ‘गेट टुगेदर’; शरद पवार यांनी केलं चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण!

ममता बॅनर्जींचा हा व्हिडीओ विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर शेअर केला असून, त्यावर ते प्रचंड संतापलेले दिसत आहे. विवेक अग्निहोत्रीने म्हटले की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ममता बॅनर्जी आपल्याबद्दलच बोलत आहेत असे वाटले. पुढे ते म्हणाले की, हो मी बंगालला गेलो होतो, पण खिलाफतने भडकावलेल्या डायरेक्ट अॅक्शन डे हत्याकांडातील बचावलेल्या लोकांची मुलाखत घेण्यासाठी तिथे गेलो होतो.

काश्मिरी लोकांची बदनामी करण्यासाठी काश्मीर फाईल्स बनवण्यात आल्याचे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणू शकता?, असा सवालही त्यांनी त्यांनी उपस्थित केला आहे. ‘हा चित्रपट नरसंहार आणि दहशतवादावर असल्याचे तुम्ही म्हणालात. पक्षाकडून निधी मिळाल्याचे तुम्ही कशाच्या आधारे म्हणू शकता?,’ असेही विवेक अग्निहोत्री म्हणाले. यानंतर संतापलेल्या विवेक अग्निहोत्रींनी ममता बॅनर्जींना इशारा दिला आहे. माझा चित्रपट दिल्ली फाईल्स असणार आहे, बंगाल फाईल्स नाही. त्यामुळे मी तुमच्यावर मानहानीचा दावा का दाखल करू शकत नाही? असे त्यांनी म्हटले आहे.

IPL_Entry_Point