मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sudhir Phadke: आजवरचा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक, 'स्वरगंधर्व सुधीर फडके'चा टीझर प्रदर्शित

Sudhir Phadke: आजवरचा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक, 'स्वरगंधर्व सुधीर फडके'चा टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 11, 2024 02:53 PM IST

Swaragandharva Sudhir Phadke Teaser: एक वेगळ्या धाटणीचा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर सध्या चर्चेत आहे.

Swaragandharva Sudhir Phadke Teaser
Swaragandharva Sudhir Phadke Teaser

Sunil Barve Upcoming movie: मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. अशातच आता संगीत क्षेत्राशी संबंधीत एक चित्रपट देखील येणार आहे. या चित्रपटाचे नाव 'स्वरगंधर्व सुधीर फडके' आहे. ज्यांच्या अवीट सुरांनी साऱ्यांनाच वेड लावले, ज्यांच्या 'गीतरामायणा'ने प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात स्थान निर्माण केले, त्या बाबुजींचा आयुष्यपट लवकरच रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येत आहे. नुकताच 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे टीझरमध्ये?

'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाच्या १ मिनिटे १५ सेकंदाच्या टीझरमध्ये प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी गायकाचे म्हणजेच सुधीर फडके यांचा जीवनप्रवास उलघडणार आहे. टीझरमध्ये 'माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासात पदोपदी सोसलेल्या जाणिवेतून, ही आर्तता माझ्या स्वरात उतरते,' असे एक वाक्य आहे. या वाक्यातूनच 'बाबुजीं'च्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. टीझर पाहाता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वाचा: मलायकाने घटस्फोट का घेतला? किती घेतली पोटगी? जाणून घ्या

कोणते कलाकार दिसणार?

'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश देशपांडे करत आहे. तसेच या चित्रपटात सुनील बर्वे, आदिश वैद्य, शरद पोंक्षे, सागर तळाशीकर, मृण्मयी देशपांडे, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद योगेश देशपांडे यांचे असून सौरभ गाडगीळ, योगेश देशपांडे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट १ मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून आजवरचा हा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक ठरेल.
वाचा: राखी सावंतने बुरख्याच्या आत बिकिनी घातली अन्...; फराह खानने सांगितला मजेशीर किस्सा

दिग्दर्शकाने व्यक्त केला आनंद

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, "एखाद्या नावाजलेल्या व्यक्तिमत्वाचा जीवनपट पडद्यावर दाखवणे नक्कीच सोपे नसते. त्यासाठी सखोल अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. 'बाबुजी' हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. मला त्यांचा जीवनपट पडद्यावर दाखवायचा होता. यासाठी मी जमेल तितकी त्यांच्याविषयी माहिती मिळवली. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना मी भेटलो. त्यांच्याविषयी काही अशा गोष्टी कळल्या, ज्या अनेकांना माहित नाही. त्यांचे तेच आयुष्य मी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची गायली आपल्या सगळ्यांना माहित आहे, परंतु त्यामागचा संघर्ष खूप कठीण होता. त्यांचा हा प्रवास 'स्वरगंधर्व सुधीर फडके'मध्ये पाहायला मिळणार आहे."

IPL_Entry_Point