मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Malaika Arora: मलायकाने घटस्फोट का घेतला? किती घेतली पोटगी? जाणून घ्या

Malaika Arora: मलायकाने घटस्फोट का घेतला? किती घेतली पोटगी? जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 10, 2024 04:24 PM IST

Malaika Arora Talks About Alimony: मलायकाने नुकताच एका वेब साईटला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने पोटगीच्या रक्कमेवर प्रतिक्रिया दिली आहे.

Arbaaz Khan Unfollows Malaika Arora
Arbaaz Khan Unfollows Malaika Arora

Malaika Arora on Divoce: बॉलीवूड अभिनेता अरबाज खानने २४ डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा निकाह केला. त्याने मेकअप आर्टिस्ट शौरा खानशी निकाह केला आहे. अरबाजची बहिण अर्पिताच्या घरी त्यांच्या या निकाहचे आयोजन करण्यात आले होते. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित त्यांचा निकाह पार पडला. यापूर्वी अरबाजने बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केले होते. पण लग्नाच्या १९ वर्षांनंतर मलायका आणि अरबाजने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये मलायकाने घटस्फोटावर आणि पोटगीच्या रक्कमेवर भाष्य केले आहे.

मलायकाने 'पिंकविला' या वेब साइटला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मलायकाने वयाच्या २५व्या वर्षी लग्न केल्याचे सांगितले. तसेच “मी अशा कुटुंबात वाढले नव्हते, जिथे ‘अरे तुला या वयात लग्न करावे लागेल’ असे म्हटले गेले. मला हवे तसे आयुष्य जगण्यास सांगितले होते. बाहेर जा, जीवनाचा आनंद घे, नवनवीन लोकांना भेट आणि रिलेशनशिपमध्ये राहा, असे सांगण्यात आले होते. इतकी मोकळीक असूनही माझ्या डोक्यात काय विचार आले ते मला माहित नाही, मी २२-२३ वर्षांचे असताना म्हणाले की मला लग्न करायचे आहे. माझ्यावर कोणीही लग्नासाठी दबाव आणला नाही पण मला तेच करायचे होते, कारण त्या क्षणी माझ्याकडे हा सर्वोत्तम पर्याय होता” अशी कबूली मलायकाने दिली.
वाचा: एल्विश यादवने युट्यूबर मॅक्सटर्नला केली बेदम मारहाण, पोलिसात तक्रार दाखल

त्यानंतर तिने “जेव्हा मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला वाटत नाही की इंडस्ट्रीमध्ये खूप महिला घटस्फोट घेत होत्या आणि आयुष्यात पुढे जात होत्या. मला माझ्यासाठी, माझ्या वैयक्तिक वाढीसाठी, मला माझ्या मुलाला आनंदी ठेवण्यासाठी, मुलाने आयुष्यात काहीतरी करावे यासाठी घटस्फोट हा योग्य पर्याय वाटला आणि मी तेच केले” असे म्हटले.
वाचा: रुचिरा जाधव म्हणते 'राजा येईल गं', काय आहे नेमकी भानगड?

पुढे या मुलाखतीमध्ये मलायकाने सोशल मीडियावर कमेंट करुन पोटगीचा उल्लेख करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. "‘इतका महाग ड्रेस मलायकाला परवडू शकतो कारण तिला पोटगीत खूप पैसे मिळाले आहेत,’ अशी एक कमेंट होती. ती पाहून मला धक्का बसला. या कमेंट्स पाहून मला इतकंच वाटलं की तुम्ही आयुष्यात कोणत्याही स्तरावर काहीही केले तरी त्याचा काही फरक पडत नाही" असे मलायका म्हणाली.

IPL_Entry_Point